सोनम उचाव : करिना म्हणाली होती, मी जादा बोलू नये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 20:20 IST2016-11-20T20:20:55+5:302016-11-20T20:20:55+5:30
‘कॉफी विथ करण’या शोमध्ये करिना कपूरसह भाग घेताना मी तिच्याबद्दल काही चुकीचे बोलू नये असे तिला वाटत होते. यासोबतच ...

सोनम उचाव : करिना म्हणाली होती, मी जादा बोलू नये
सोनम कपूर आपली ‘मन की बात’ करताना नेहमीच कॉन्ट्राव्हर्सी तयार क रते. यामुळेच आपल्याबाबत असे काही घडू नये असे करिनाला वाटत असावे. याचमुळे तिने मला असे सांगितले होते असे सोनमला सुचवायचे होते. सोनम कपूर व करिना कपूर दोघी आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्माती सोनमची बहीण रिया कपूर आहे.
ग्लोबल इंडियन फेस्टिव्हलमध्ये पत्रकारांशी बोलताना सोनम म्हणाली, करिना बॉलिवूडमधील सर्वांत जवळच्या मैत्रिणीपैकी आहे. करिनाच्या मते ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट मुलींचा पहिला चित्रपट ठरणार आहे. अशा प्रकारचा चित्रपट निर्माण करण्याची हिंमत आतापर्यंत कुणीच केली नाही. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात सोनम, करिनासह स्वरा भास्कर व शिखा तल्सानियाची प्रमुख भूमिका आहे. हा असा चित्रपट आहे जेथे सर्व काही महिलांवर आधारित असून, या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये एकता कपूर देखील सहकार्य करीत आहे.
सोनम कपूर मागील काही दिवसांत बोलताना अनेक गोष्टींमध्ये अलगद अडकत गेली होती. नेहा धुपियाच्या शोमध्ये भाऊ हर्षवर्धन सोबत आलेल्या सोनमने त्याला गर्लफ्रेन्डसोबत जाताना प्रोटेक्शन घेण्याचा सल्ला दिला होता. याशिवाय तिने माझे कुणा को-स्टारसोबत अफेअर नाही, असे सांगून त्यांना तुच्छ लेखण्याचा प्रकार केला होता. मी अजून कोणत्याच को स्टार सोबत सेक्स केला नसल्याचेही ती म्हणाली होती.