​फिल्मफेअर अवार्ड पार्टीत भाव खाऊन गेल्यात , सोनम , सोना अन् आलिया !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 11:36 IST2017-01-10T11:36:03+5:302017-01-10T11:36:03+5:30

Filmfare Awards: Alia Bhatt, Sonam Kapoor and Sonakhi Sinha slay with their style at the pre event party : Alia: Sonam : Sona : काल रात्री फिल्मफेअर अवार्डची प्री-पार्टी रंगली. या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटींनी हटके स्टाईलमध्ये एन्ट्री केली. यात सर्वाधिक भाव खाऊन गेल्यात त्या, आलिया भट्ट, सोनम कपूर आणि सोनाक्षी सिन्हा.

Sonam, Sona and Aliya, at the Filmfare Awards party eat! | ​फिल्मफेअर अवार्ड पार्टीत भाव खाऊन गेल्यात , सोनम , सोना अन् आलिया !

​फिल्मफेअर अवार्ड पार्टीत भाव खाऊन गेल्यात , सोनम , सोना अन् आलिया !

ार्ड सीझनमुळे बॉलिवूडमध्ये सध्या सर्वत्र धामधूम दिसतेय. बॉलिवूडमधील प्रत्येकजण यासाठी उत्सूक दिसत आहे. येत्या १४ जानेवारीला ६२ वा फिल्मफेअर अवार्ड सोहळा रंगणार आहे. त्याची सध्या जोमात तयारी सुरु आहे. त्यासाठीचा बॉलिवूड सेलिब्रिटींचा उत्साह सुद्धा ओसंडून वाहतो आहे. काल रात्री फिल्मफेअर अवार्डची प्री-पार्टी रंगली. या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटींनी हटके स्टाईलमध्ये एन्ट्री केली. यात सर्वाधिक भाव खाऊन गेल्यात त्या, आलिया भट्ट, सोनम कपूर आणि सोनाक्षी सिन्हा.
होय, ब्लॅक क्रॉप टॉप आणि हॉट पॅन्ट अशा ‘हॉट’ अवतारात आलियाने या पार्टीला हजेरी लावली. सध्या आलिया बॉलिवूडची सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जातेय. त्यामुळे आलियाची या पार्टीत एन्ट्री होताच, सगळे कॅमेरे तिच्याकडे वळले. फिल्मफेअर अवार्ड सोहळ्यात आलिया ‘उडता पंजाब’ आणि ‘डिअर जिंदगी’ अशा तिच्या दोन सिनेमांमधील गाण्यांवर परफॉर्म करणार आहे.



आलियाप्रमाणेच सोनम कपूर हिनेही या पार्टीत अगदी ‘खल्लास गर्ल’ बनून एन्ट्री केली. सोनम आली, तशा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.  ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये सोनमचे सौंदर्य आणखीच खुलले. सोनमला उगाच बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हटले जात नाही, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केले.



सोनाक्षी सिन्हा ही सुद्धा अगदी स्टाईलिश अवतारात पार्टीत सामील झाली. तिच्या स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. गतवर्षी महिलाप्रधान सिनेमांमध्ये सोनाचाच जलवा दिसला. ‘अकिरा’मधील अ‍ॅक्शन अवतारातील सोना भाव खाऊन गेली. ‘फोर्स2’मध्येही तिचा अ‍ॅक्शन अवतार दिसला. त्यामुळे यंदाच्या फिल्मफेअर अवार्ड्मध्ये सोनाची झोळी अवार्ड्सने भरेल, अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांना वाटतेय.



आता कोण किती अवार्ड्स पटकावतं, हे तर १४ जानेवारीच्या रात्रीच कळेल. तोपर्यंत आलिया, सोनम व सोनाचे हे व्हिडिओ तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता.

 

Web Title: Sonam, Sona and Aliya, at the Filmfare Awards party eat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.