​ सोनम कपूरच्या कपाटातून सुरु होणार ‘चॅरिटी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 15:11 IST2017-03-26T09:41:47+5:302017-03-26T15:11:47+5:30

बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूर म्हणजे एक बिनधास्त व्यक्तिमत्त्व. बॉलिवूडची फॅशननिस्टा अशी ओळख असलेली सोनम आता चॅरिटी करणार आहे. होय, ...

Sonam Kapoor's cover will start from 'Charity'! | ​ सोनम कपूरच्या कपाटातून सुरु होणार ‘चॅरिटी’!

​ सोनम कपूरच्या कपाटातून सुरु होणार ‘चॅरिटी’!

लिवूडची अभिनेत्री सोनम कपूर म्हणजे एक बिनधास्त व्यक्तिमत्त्व. बॉलिवूडची फॅशननिस्टा अशी ओळख असलेली सोनम आता चॅरिटी करणार आहे. होय, सोनमच्या कपड्यांच्या कपाटामधून चॅरिटी सुरु होणार आहे. कसे? कळले नसेल तर आम्ही सांगतो. कर्करोगाने पीडित मुलांसाठी सोनम तिच्या पर्सनल कलेक्शनमधील डिझाईनर ड्रेसेसचा लिलाव करणार आहे. केवळ डिझाईनर आऊटफिट्सच नाही तर काही ब्रॅन्डेड बॅग्सचाही लिलाव ती करणार आहे. यातून उभा राहिला सगळा पैसा, ती कर्करोगपीडित मुलांच्या उपचारासाठी दान करणार आहे. 
गतवर्षी सोनम कडल फाऊंडेशनशी जुळली होती. या फाऊंडेशनची ती ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर आहे. हे फाऊंडेशन कॅन्सरपीडित मुलांसाठी काम करते. कॅन्सरसारख्या भयंकर आजाराशी लढा देणाºया मुलांच्या मदतीला अशाप्रकारे धावून येणे, निश्चित मोठी गोष्ट आहे. यासाठी सोनमचे अभिनंदन करायलाच हवे.

also read :  ​सोनम कपूरचा बॉयफ्रेन्ड आनंद अहुजासोबतचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलातं?

अलीकडे सोनम सेन्सॉरशिप या विषयावर बोलली होती. माझा सेन्सॉरशिपवर भरवसा नाही. सर्वांना सर्व प्रकारचे कपडे वापरण्याचा, आपले सौदर्यं हव्या त्या पद्धतीने व्यक्त करण्याचा आणि आपल्या मनाप्रमाणे विवाह करण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझे म्हणाल तर मला सेन्सॉरशिप अजिबात मान्य नाही.  प्रत्येक मुलीला स्वत:चा निर्णय घेता यायला हवा. आपण बिकीनी वापरायची की, बुर्खा हे तिला स्वत:ला ठरवता यायला हवे. धर्म, कपडे, शिक्षण आणि लग्न यांबाबतही हाच मुद्दा लागू होतो. आपण लोकांवर जितकी बंधणं घालता लोक तितकेच आक्रमक होतात.  आपला देश आणि या देशातील नागरिक जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा घटक आहोत. म्हणूनच लोकांना स्वतंत्रपणे जगण्याच हक्क असायला पाहिजे, असे ती म्हणाली होती.
 

Web Title: Sonam Kapoor's cover will start from 'Charity'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.