सोनमचा आनंद गगनात मावेना, लवकरच लंडनमध्ये खरेदी करणार नवा आशियाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 12:03 IST2019-07-18T11:59:51+5:302019-07-18T12:03:36+5:30
सोनम आणि आनंद अनेकवेळा इंस्टाग्रामवर आपले रोमॅन्टिक अंदाजातील फोटो पोस्ट करत असतात.

सोनमचा आनंद गगनात मावेना, लवकरच लंडनमध्ये खरेदी करणार नवा आशियाना
लग्नानंतर अनेक अभिनेत्रींनी सिनेमापासून लांब जात आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिले. तसेच दुस-या देशात स्थायिक झाल्या. याच यादीत सोनम कपूरचा समावेश होण्याची शक्यता आहे. कारण सोनम पती आनंद आहुजासह लंडनमध्ये शिफ्ट होण्याच्या विचारात आहे. सोनम लंडनमध्ये स्थायिक होण्यामागे कारणही तसे खास आहे. सोनम कपूरने मागच्या वर्षी मे महिन्यात आनंद आहूजा सोबत लग्न केले. आनंद आहूजा लंडनमध्ये राहतो. लग्न झाल्यापासून एकमेंकाना भेटण्यासाठी कधी सोनम लंडनला जाते तर कधी आनंद भारतात येतो. त्यामुळे आता पुढचा विचार करत सोनमने पती आहुजासह लंडनलाच राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सोनम-आनंद वेस्ट लंडनच्या नॉटिंग हिल परिसरात एक घर घेण्याच्या तयारीत आहेत.
सोनम आणि आनंद अनेकवेळा इंस्टाग्रामवर आपले रोमॅन्टिक अंदाजातील फोटो पोस्ट करत असतात. त्यांच्यात खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळते. आनंद सोनमची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. आता हेच बघा ना, सोनम बुट ट्राय करत असताना आनंदने काय करावे, तर चक्क सर्वांसमोर तिची बुटांची लेस बांधून दिली.
दिल्लीच्या एका शू स्टोरच्या लॉन्चिंगदरम्यानचा हा फोटो. यादरम्यान सोनमने एक शू पेयर ट्राय केली. सोनमन बुट पायात टाकले आणि पुढच्याच क्षणाला आनंदने गुडघ्यावर बसत तिचे शू लेस बांधलेत. आनंद सोनमच्या बुटांची लेस बांधत होता तर सोनम मनातल्या मनात चक्क लाजत होती.
आनंद आणि सोनमच्या अफेअरची चर्चा 2016पासून सुरू झाली आणि 2018 मध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकलेत. आनंद हा एका दिल्लीचा मोठा बिझनेसमॅन आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. आनंद फॅशन ब्राँड इँंल्ली चा मालक आहे.
आनंदची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे, तो प्रसिद्ध बिझनेसमॅन हरीश अहुजा यांचा नातू आहे. आनंदचे वषाकार्ठी उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे. आनंदला फिरण्याशिवाय शूज आणि कारची आवड आहे.