सोनम कपूरसह वीरे दी वेडिंगची गर्ल गँग दिसली स्विमिंग पूलजवळ चील करताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 12:03 IST2017-11-09T04:48:48+5:302017-11-09T12:03:18+5:30

काही दिवसांपूर्वीच माहिरा खान आणि दीपिका पादुकोण त्यांच्या कपड्यांना घेऊन ट्रोल झाल्या आहेत. यानंतर वीरे दी वेडींग स्टारर सोनम ...

Sonam Kapoor and Veer The Wedding's Girl Gang Appeared to the Swimming Pool | सोनम कपूरसह वीरे दी वेडिंगची गर्ल गँग दिसली स्विमिंग पूलजवळ चील करताना

सोनम कपूरसह वीरे दी वेडिंगची गर्ल गँग दिसली स्विमिंग पूलजवळ चील करताना

ही दिवसांपूर्वीच माहिरा खान आणि दीपिका पादुकोण त्यांच्या कपड्यांना घेऊन ट्रोल झाल्या आहेत. यानंतर वीरे दी वेडींग स्टारर सोनम कपूर बिकनीतील फोटोला घेऊन ट्रोल झाली आहे. सोनम सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी थायलँडला गेली आहे. सोनम कपूरसोबत सध्या थायलँडमध्ये शिखा तल्सानिया, स्वरा भास्कर आणि करिना कपूर खान सुद्धा आहेत. चारही अभिनेत्री फुकेटमध्ये एका गाण्याचे शूट करतायेत.
 
त्यावेळी स्वरा भास्करने आराम करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये या सर्व तारका स्विमिंग पूल जवळ आराम करताना दिसतायेत.  स्वराने या व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे  की ‘फ्लाइटमध्ये केलेल्या लाँग जर्नीनंतर.. चिल विद सोनम, रेहा कपूर, शिखा आणि करिना कपूर..’

थायलँडला जातानाच करिना कपूरने घातलेले डेनिमचे जॅकेटची खूप चर्चा झाली होती.  करिनाचा हा जॅकेट तब्बल 84 हजाराचा आहे.  करिना आणि चित्रपटाची इतर टीम जवळपास 10 दिवस इकडेच राहणार आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंशाक घोष करतो आहे. यात करिनासोबत रोमांस करताना सुमीत व्यास दिसणार आहे. चित्रपटाची बरीचशी शूटिंग दिल्लीतच होणार आहे.  वीरे दी वेडिंग चित्रपटाची कथा चार मुलींच्या भवती फिरणारी आहे. वीरे दी वेडिंग'मध्ये करिना   एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. बेबो प्रॅक्टिकल तर सोनमला थोडीशी हळवी असेल. आपल्याला जे वाटते, ज्यामुळे आनंद मिळतो त्याच गोष्टी करण्यात ती विश्वास ठेवणारी मुलगी आहे.’ पुढच्या वर्षी 18 मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. रेहा पहिल्यांदा करिनाकडे या चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन गेली. तेव्हा करिनाने या चित्रपटाला नकार दिला होता. अलीकडे एका मुलाखतीत खुद्द करिनाने हा किस्सा सांगितला होता.