बाबो ! सोनाली बेंद्रेच्या प्रेमात वेडा झाला होता हा पाकिस्तानी क्रिकेटपटू, करणार होता हे धक्कादायक काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 11:06 AM2022-01-01T11:06:39+5:302022-01-01T11:34:38+5:30

आज सोनाली बेंद्रेचा वाढदिवस (Sonali Bendre Birthday)आहे. मराठी कुटुंबात जन्मलेल्या सोनालीने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केले.

Sonali bendre birthday special lesser known facts about | बाबो ! सोनाली बेंद्रेच्या प्रेमात वेडा झाला होता हा पाकिस्तानी क्रिकेटपटू, करणार होता हे धक्कादायक काम

बाबो ! सोनाली बेंद्रेच्या प्रेमात वेडा झाला होता हा पाकिस्तानी क्रिकेटपटू, करणार होता हे धक्कादायक काम

googlenewsNext

आज सोनाली बेंद्रेचा वाढदिवस  (Sonali Bendre Birthday)आहे. सोनाली (Sonali Bendre)आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करतेय. मराठी कुटुंबात जन्मलेल्या सोनालीने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केले. 90 च्या दशकातील सर्वाधिक सुंदर, प्रतिभावान आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सोनालीने अनेक हिट सिनेमे दिलेत. तिने सरफरोश, दिलजले, रक्षक, जख्म, हम साथ साथ है यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2002 मध्ये सोनालीने दिग्दर्शक गोल्डी बहलसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नानंतर ती खूपच कमी चित्रपटांमध्ये काम केले.

२०१८ मध्ये सोनालीला कॅन्सरचा सामना करावा लागला होता. कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी सोनाली न्यूयॉर्कला गेली होती. कॅन्सर झाल्याची माहिती देखील तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. पण काहीच महिन्यात तिने या आजारावर मात केली.

सोनालीने तिच्या करियरची सुरुवात आग या चित्रपटापासून केली होती. हा चित्रपट काही बॉक्स ऑफिसवर चालला नाही. पण दिलजले या तिच्या चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या सौदर्यावर तिचे चाहते फिदा होते. केवळ सामान्य लोकच नाहीत तर एक क्रिकेटर देखील तिच्या सौंदर्यावर फिदा झाला होता. 

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरला सोनाली प्रचंड आवडत असल्याने तो त्याच्या पाकिटात देखील तिचा फोटो घेऊन फिरत असे. त्याला सोनाली आवडते हे त्याच्या टीममधील देखील सगळ्यांना माहीत होते. शोएबला सोनालीवर क्रश असून तिच्यासाठी तो काहीही करू शकतो असे त्याने एका कार्यक्रमात देखील सांगितले होते.

शोएबने एका टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने सांगितले होते की, सोनालीवर माझे प्रचंड क्रश असून तिच्याकडून होकार मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो.पाकिस्तानचा हा माजी गोलंदाज एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेसाठी अक्षरश: वेडा झाला होता.

सोनालीचा फोटो सतत त्याच्या वॉलेटमध्ये असायचा.शोएबने या मुलाखतीत मजेशीर अंदाजात सांगितले होते की, सोनालीने माझे प्रेम स्वीकारले नाही तर मी तिचे अपहरण करेन. त्याचे हे उत्तर ऐकून सगळ्यांनाच हसू कोसळले होते. . शोएबने ‘अंग्रेजी बाबू देसी मेम’ या चित्रपटात सोनालीला पहिल्यांदा पाहिले होते आणि तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता.

Web Title: Sonali bendre birthday special lesser known facts about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.