​लग्नाआधीच सोनाक्षी सिन्हाचे झाले ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 14:43 IST2017-03-20T09:13:57+5:302017-03-20T14:43:57+5:30

मध्यंतरी आपली लाडकी सोना अर्थात सोनाक्षी सिन्हा लग्न करणार, अशा बातम्या आपल्या कानावर आल्या. पण आता लग्नाआधीच सोना व ...

Sonakshi Sinha's breakup even before marriage? | ​लग्नाआधीच सोनाक्षी सिन्हाचे झाले ब्रेकअप?

​लग्नाआधीच सोनाक्षी सिन्हाचे झाले ब्रेकअप?

्यंतरी आपली लाडकी सोना अर्थात सोनाक्षी सिन्हा लग्न करणार, अशा बातम्या आपल्या कानावर आल्या. पण आता लग्नाआधीच सोना व तिचा कथित बॉयफे्रन्ड बंटी सचदेव या दोघांचे ब्रेकअप झाल्याची खबर आहे. होय, सोना व बंटी या दोघांमध्ये काहीही नाही. मीडियाचे मानाल तर, खुद्द सोनाने हे स्पष्ट केले आहे. अलीकडे सोना ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’च्या सक्सेस पार्टीमध्ये दिसली होती. या पार्टीत सोनाक्षी तसेच काही बोलली होती. मी आता सिंगल आहे, असे ती म्हणाली होती. (अर्थात दुसºयाच दिवशी ती व बंटी दोघेही एका रेस्टॉरंटबाहेर दिसले होते. दोघांनीही मीडियापासून लपण्याचे बरेच प्रयत्नही केले होते.)
अगदी आत्ता आत्ता बंटी सचदेव याची बहीण सीमा खान (सलमान खानचा भाऊ सोहेल खान याची पत्नी) हिच्या वाढदिवसाच्या पार्टीत सोनाक्षी हजर होती.  बंटीच्या आईच्या ६० व्या वाढदिवसालाही सोनाने हजेरी लावली होती. इतकेच नाही तर गेले न्यू ईयर बंटी व सोना दोघांनी दुबईत सेलिब्रेट केले होते. यापश्चातही मी सिंगल आहे, असे सोनाक्षी अलीकडे सांगताना दिसते आहे.



ALSO READ : ​लवकरच ‘एन्गेज्ड’ होणार सोनाक्षी सिन्हा?

सोनाक्षीचे वडील शत्रूघ्न सिन्हा आणि आई दोघांनाही बंटी सचदेव आवडत नसल्याचेही ऐकवात आले आहे. अर्थात सोनाने याची कधीच पर्वा केली नाही. तसली पर्वा करण्यांपैकी सोना नाहीच. पण तरिही सोना स्वत:ला सिंगल असल्याचे सांगतेय, यामागे नक्कीच काही कारण असावे. कदाचित पर्सनल स्पेस मेंटेन करण्यासाठी सोना असे सांगत असावी. कारण लवकरच सोनाचा ‘नूर’ हा सिनेमा येतोय. या सिनेमाचे प्रमोशन लवकरच सुरु होणार आहे. याचसाठी आपण सिंगल असल्याची बतावणी सोना करत असावी.

Web Title: Sonakshi Sinha's breakup even before marriage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.