Sonakshi Sinha Wedding: लाल साडी अन् भांगात कुंकू; नववधू सोनाक्षी सिन्हाच्या वेडिंग लूकची सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 08:30 AM2024-06-24T08:30:03+5:302024-06-24T08:30:49+5:30

लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरने मुंबईत वेडिंग रिसेप्शन ठेवलं होतं. या वेडिंग रिसेप्शनला नववधू सोनाक्षीच्या लूकने लक्ष वेधून घेतलं. 

sonakshi sinha zaheer iqbal wedding actress ditch pestal color wear red saree for reception | Sonakshi Sinha Wedding: लाल साडी अन् भांगात कुंकू; नववधू सोनाक्षी सिन्हाच्या वेडिंग लूकची सोशल मीडियावर चर्चा

Sonakshi Sinha Wedding: लाल साडी अन् भांगात कुंकू; नववधू सोनाक्षी सिन्हाच्या वेडिंग लूकची सोशल मीडियावर चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लग्नबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड जहीर इक्बालशी रजिस्टर पद्धतीने लग्न करत सोनाक्षीने रविवारी(२३ जून) नव्या आयुष्याला सुरुवात केली. कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि जहीरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरने मुंबईत वेडिंग रिसेप्शन ठेवलं होतं. या वेडिंग रिसेप्शनला नववधू सोनाक्षीच्या लूकने लक्ष वेधून घेतलं. 

वेडिंग रिसेप्शनसाठी सोनाक्षी लाल रंगाची साडी नेसून नववधूप्रमाणेच नटली होती. केसांत गजरा आणि मोजकेच दागिने परिधान करत तिने अगदी सिंपल लूक केला होता. तिने भांगात कुंकूही भरलं होतं. नववधू सोनाक्षीच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. लग्नात फिकट रंगाचा आणि भरजरी लेहेंग्याचा बॉलिवूड अभिनेत्रींचा ट्रेंड बदलत नववधू सोनाक्षीने लाल रंगाला पसंती दिली. तर जहीरने ऑफ व्हाइट रंगाचा सूट परिधान केला होता. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनाक्षी आणि जहीरच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. 

सोनाक्षी आणि जहीर गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता त्यांनी लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. सोनाक्षीप्रमाणेच जहीरदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनयाबरोबरच तो मॉडेलिंगदेखील करतो. सोनाक्षी आणि जहीरने डबल XL सिनेमात एकत्र काम केलं होतं. जहीरचे वडील व्यावसायिक असून त्याचे सलमान खानशीही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 
 

Web Title: sonakshi sinha zaheer iqbal wedding actress ditch pestal color wear red saree for reception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.