सोनाक्षी सिन्हाचा नवा सीफेसिंग फ्लॅट बघा! म्हणाली, "फक्त चमचे, भांडी, खुर्च्या...डोकं गरगरतंय"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 01:03 PM2023-05-31T13:03:34+5:302023-05-31T13:04:53+5:30

सोनाक्षीने नवीन सीफेसिंग फ्लॅटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

sonakshi sinha shifts in a new sea facing flat says doing home is not easy | सोनाक्षी सिन्हाचा नवा सीफेसिंग फ्लॅट बघा! म्हणाली, "फक्त चमचे, भांडी, खुर्च्या...डोकं गरगरतंय"

सोनाक्षी सिन्हाचा नवा सीफेसिंग फ्लॅट बघा! म्हणाली, "फक्त चमचे, भांडी, खुर्च्या...डोकं गरगरतंय"

googlenewsNext

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi  Sinha)  मुंबईत नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. सीफेसिंग व्ह्यू असलेला हा आलिशान फ्लॅट पाहून डोळेच पांढरे होतील. सोनाक्षी नुकतीच नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली असून तिने फ्लॅटची झलक दाखवली आहे. मात्र शिफ्ट होणं, स्वत:चं सामान स्वत: लावणं हे सगळं सोप्पं नाही असं म्हणत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

सोनाक्षीने नवीन सीफेसिंग फ्लॅटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मोठ्या हॉलमधून सीलिंकचा सुंदर नजारा दिसतोय. तर नव्या फ्लॅटमध्ये सामानांचे बॉक्स ठेवलेले दिसत आहेत. हे सगळं सामान तिला लावायचं असल्याने तिला त्याचा वैताग आल्याचं ती म्हणतेय. नवीन घर लावणं सोप्पं नाही असं तिने पोस्टमध्ये म्हटलंय. 

ती लिहिते, "अडल्टिंग...अवघड आहे! गार्डनिंगचं सामान, भांडी, गाद्या, लाईट्स, उश्या, खुर्च्या, टेबल, चमचे, सिंक, बिन्स...बापरे! डोकं गरगरत आहे. घर लावणं सोप्पं नाही."


 
सोनाक्षी फोटोंमध्ये थकलेली दिसत आहे. आता ती याच फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे. अनेकांनी तिला कमेंट्समध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. आम्हाला तुझा अभिमान वाटतो अशाही कमेंट्स तिला जवळच्या व्यक्तींनी केल्या आहेत. सोनाक्षी नुकतीच झोया अख्तर आणि रिमा कागतीच्या 'दहाड' वेबसिरीजमध्ये दिसली. यातील तिच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. आता ती आगामी हॉरर कॉमेडी फिल्म 'ककुडा'मध्ये झळकणार आहे. 

Web Title: sonakshi sinha shifts in a new sea facing flat says doing home is not easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.