सोनाक्षी सिन्हा 'ह्या' अभिनेत्याला करतेय डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 14:14 IST2019-01-07T14:12:20+5:302019-01-07T14:14:34+5:30
सध्या बॉलिवूडमधील काही जोड्या त्यांच्या रोमांसमुळे चर्चेत आहेत. या कलाकारांच्या यादीत सोनाक्षी सिन्हाच्या नावाचा देखील समावेश आहे.

सोनाक्षी सिन्हा 'ह्या' अभिनेत्याला करतेय डेट
मागील वर्ष बॉलिवूडमध्ये लग्नसराईचे वर्ष होते. आता २०१९ वर्षात देखील बरेच लग्न व अफेयरच्या चर्चा ऐकायला मिळू शकतात. सध्या बॉलिवूडमधील काही जोड्या आपल्या रोमँटिक लाईफबद्दल चर्चेत आहेत. खऱ्या आयुष्यात रोमांस करणाऱ्या कलाकारांच्या यादीत आता सोनाक्षी सिन्हाच्या नावाचादेखील समावेश झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सोनाक्षी सध्या नवोदीत अभिनेता जहीर इक्बालसोबत रोमांस करते आहे. जहीर सलमान खान फिल्म प्रोडक्शनच्या नोटबुकमधून यावर्षी २०१९मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात मोनीष बहलची मुलगी प्रनूतन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाक्षी व जहीर सलमानमुळे एकमेकांना भेटले. अद्याप ते दोघे लोकांसमोर एकत्र आलेले नाहीत. मात्र गेल्या महिन्यात सलमान खानच्या बर्थडे पार्टीत दोघे एकत्र दिसले होते.
सोनाक्षी आधी बंटी सचदेवासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण याचवर्षी फेब्रुवारीत दोघांचेही ब्रेकअप झाले. खरे तर दोघांचेही रिलेशन लग्नापर्यंत पोहोचणार असे मानले जात होते. पण अचानक त्यांच्या ब्रेकअपची खबर आली. बंटीनंतर सोनाच्या आयुष्यात जहीरने एन्ट्री घेतली आहे.
या वर्षात नव्या जोड्यांमध्ये या जोडीचा देखील समावेश असेल बोलले जात आहे. सोनाक्षी यावर्षी प्रदर्शित होणारा मल्टिस्टारर चित्रपट 'कलंक'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत माधुरी दीक्षित, वरूण धवन, आलिया भट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.