/> होय आपली दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचा पारा चढला आहे. सोनाक्षीला असे काय झालेय कि ती दबंगगिरी दाखवायला लागलीये. तर त्याला कारणही तसेच आहे, सोनाक्षी चिडलीये ते लाहोर स्फोटात बळी गेलेल्या निष्पाप लोकांच्या मृत्युमुळे. या घटनेचा सोनाला धक्का बसला असुन ती सध्या फार दु:खी आहे, सोनाक्षी म्हणतीये, अँगर डिसगस्ट... वॉट्स द पॉइंट आॅफ धिस सेन्ललेस अॅक्ट आॅफ वॉइलन्स. लाहोर मध्ये झालेल्या या भीषण आणि मनाला चटका लावणाºया कृत्यामुळे सर्वजणच हळहळत आहेत. असे उगीचच निष्पाप लोकांचे बळी जात असल्याने साहजिकच वाईट वाटणार. सोनाक्षीने सोशल साईटवर तिचा हा राग व्यक्त करुन मनातील सगळी भडास काढली आहे. आणि या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे.