सोनाक्षी-अर्जुन येणार पुन्हा एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 16:22 IST2016-08-04T10:52:16+5:302016-08-04T16:22:16+5:30
अर्जुन कपूर हा अनीस बाझमी यांच्या ‘मुबारकाँ’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हाला त्याच्यासोबत या चित्रपटात घेणार असल्याची ...

सोनाक्षी-अर्जुन येणार पुन्हा एकत्र?
र्जुन कपूर हा अनीस बाझमी यांच्या ‘मुबारकाँ’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हाला त्याच्यासोबत या चित्रपटात घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर सोनाक्षी अर्जुनसोबत दुसºयांदा चित्रपटात एकत्र दिसेल. याअगोदर ते दोघे ‘तेवर’ मध्ये एकत्र दिसले होते.
त्या दोघांमधील केमिस्ट्री फारच उत्तम असून चाहत्यांमध्ये त्यांच्या केमिस्ट्रीविषयी विशेष चर्चा सुरू असते. सध्या सोनाक्षी तिचा आगामी चित्रपट ‘अकिरा’ च्या रिलीज होण्याची वाट पाहते आहे. याअगोदर अर्जुनचा ‘की अॅण्ड का’ हा चित्रपट रिलीज झाला असून सध्या तो ‘हाफ गर्लफ्रेंड’ ची शूटींग करतो आहे.