सोना ‘नूर’ची शूटींग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 19:20 IST2016-07-05T13:50:11+5:302016-07-05T19:20:11+5:30
‘अकिरा’नंतर सोनाक्षी सिन्हा एका वेगळ्या भूमिकेसाठी सज्ज झालीय. होय, केवळ सज्जच नाही तर तिने तिच्या नव्या चित्रपटाची शूटींगही सुरु ...
.jpg)
सोना ‘नूर’ची शूटींग सुरु
‘ किरा’नंतर सोनाक्षी सिन्हा एका वेगळ्या भूमिकेसाठी सज्ज झालीय. होय, केवळ सज्जच नाही तर तिने तिच्या नव्या चित्रपटाची शूटींगही सुरु केली आहे. सोनाक्षी ‘नूर’ या चित्रपटात दिसणार आहे. यात सोना कराचीतील एका महिला पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. ‘नूर’च्या सेटवरचा एक फोटो सोनाक्षीने सोशल मीडियावर शेअर केला. माझी ‘नूर’ यात्रा सुरु, असे कॅप्शन या फोटोला तिने दिले आहे. सुनील सिप्पी दिग्दर्शित हा चित्रपट पाकिस्तानी कादंबरी ‘कराची, यू किलिंग मी’वर आधारित आहे. आयशा खान या महिला पत्रकाराभोवती ही कथा गुंफली गेली आहे.