सनाने कुणाची घेतली फिरकी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 16:43 IST2016-10-27T16:02:04+5:302016-10-27T16:43:37+5:30
सना खान सध्या ‘वजह तुम हो’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सनाने दिलेले हॉट अॅण्ड हॉटेस्ट सीन्समुळे सगळीकडे तिचीच चर्चा ...

सनाने कुणाची घेतली फिरकी?
स ा खान सध्या ‘वजह तुम हो’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सनाने दिलेले हॉट अॅण्ड हॉटेस्ट सीन्समुळे सगळीकडे तिचीच चर्चा आहे. खुद्द सना मात्र दिग्दर्शक विशाल पांड्या यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली म्हणून आनंदात आहे. त्यामुळे सेटवर ती मस्तपैकी एन्जॉय करतेय. अलीकडे सनाने खुद्द विशाल यांचीच फिरकी घेतली. होय, त्याचे झाले असे की, ‘वजह तुम हो’मध्ये सनाचा व्हायोलिन वाजवतांनाचा एक शॉट होता. विशाल पांड्या यांनी या शॉटसाठी सनाला तालीम करायला सांगितली. यासाठी व्हायोलिनिस्ट सेटवर बोलवण्यात आला आणि त्याला सनाला व्हायोलिन वाजवणे शिकवायला सांगितले गेले. किमान व्हायोलिन कसे पकडतात, ते कसे वाजवतात, इतक्या काही गोष्टी सनाने शिकणे अपेक्षित होते. पण अचानक सना विशाल यांच्याकडे गेली आणि मला हे नाहीच जमणार म्हणून गयावया करू लागली. व्हायोलिनिस्टने सुद्धा सना या जन्मात काय पण पुढच्या जन्मातही हे शिकूच शकणार नाही, असे तो म्हणाला. मग काय? विशाल यांचा नाईलाज झाला. पण हा सीन चित्रपटातून गाळणे अशक्य होते. शेवटी सनाला जसे जमेल तसे व्हायोलिनसोबत उभे केले गेले. शूट सुरु झाले. इकडे विशाल पांड्यांचे टेन्शन वाढले. पण त्यांनी ‘अॅक्शन’ म्हणतात, सनाने असे काही व्हायोलिन वाजवले की, सगळेच अवाक झालेत. विशाल यांना तर सनाचा हा शॉट पाहून कमालीचा आनंद झाला. सनाने आपली फिरकी घेतली, हे तोपर्यंत त्यांना कळून चुकले होते. यानंतर...यानंतर सेटवर चांगलीच खसखस पिकली, हे सांगणे नकोच.