सोहा-कुणालच्या संसारात कुरबुर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 18:49 IST2016-04-15T01:49:24+5:302016-04-14T18:49:24+5:30
लग्नाला उणेपुरे एक वर्ष होत नाही तोच सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्या नात्यात दरी निर्माण झाल्याची खबर ...

सोहा-कुणालच्या संसारात कुरबुर?
ल ्नाला उणेपुरे एक वर्ष होत नाही तोच सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्या नात्यात दरी निर्माण झाल्याची खबर आहे. सोहा व कुणाल यांच्यात कुण्या तिसºयाची एन्ट्री झाल्याने नव्हे तर यामागचे कारण काही वेगळेच आहे. एका वृत्तानुसार, कुणाल व सोहा यांच्यातील मतभेदाचे कारण आहे ‘बाळ’! होय, कुणालला लवकर बाळ हवे आहे. सोहा लवकरात लवकर आई बनावी, असा कुणालचा आग्रह आहे. सोहाला मात्र आणखी काही चित्रपट करायचे आहेत. सोहा कुणालला ऐनकेनप्रकारे समजवण्याचे प्रयत्न करतेय. पण कुणाल ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. हेच दोघांमधील भांडणाचे करण आहे. कुणालच्या कुटुंबालाही लवकर नातवाचे तोंड पाहायचे आहे. गतवर्षी २५ जानेवारीला सोहा व कुणाल विवाहबंधनात अडकले होते. दोन वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.