सोशल मीडिया म्हणजे धारदार शस्त्र : विशाल मल्होत्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 21:49 IST2017-09-28T16:19:47+5:302017-09-28T21:49:55+5:30

सतीश डोंगरे सध्या सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांमध्ये सोशल मीडियाची जबरदस्त क्रेझ आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व्यासपीठ म्हणून बघितल्या जात असलेल्या सोशल मीडियाचा ...

Social media is a sharp weapon: Vishal Malhotra | सोशल मीडिया म्हणजे धारदार शस्त्र : विशाल मल्होत्रा

सोशल मीडिया म्हणजे धारदार शस्त्र : विशाल मल्होत्रा

<
strong>सतीश डोंगरे


सध्या सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांमध्ये सोशल मीडियाची जबरदस्त क्रेझ आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व्यासपीठ म्हणून बघितल्या जात असलेल्या सोशल मीडियाचा वापर मात्र दोन्ही पद्धतीने करता येतो. या माध्यमाचा वापर जेवढा चांगला करता येतो, तेवढाच तो चुकीच्या पद्धतीनेही करता येतो. वास्तविक हे माध्यम एखाद्या धारदार शस्त्राप्रमाणे आहे. ज्याचा वापर पूर्णत: करणाºयावर अवलंबून आहे, असे मत अभिनेता विशाल मल्होत्रा याने व्यक्त केला. त्याच्या आगामी ‘तू हैं मेरा संडे’ या चित्रपटानिमित्त त्याच्याशी संवाद साधला असता, त्याने प्रत्येक प्रश्नाचे दिलखुलासपणे उत्तरे दिली. 

प्रश्न : बºयाच काळानंतर तू मोठ्या पडद्यावर परतत आहेस, यामागे काही खास कारण? 
- होय, गेल्या चार वर्षांपासून पडद्यावर झळकलो नाही. यामागे काही विशेष कारण जरी नसले तरी, मी चांगल्या संधीच्या शोधात होतो. वास्तविक सुरुवातीपासूनच ‘सब्र का फल मिठा होता हैं’ या विचाराने मी चालत आलो आहे. अखेर मला या चित्रपटाच्या माध्यमातून ती संधी मिळाली. चित्रपटाची कथा सर्वोत्कृष्ट असून, प्रेक्षकांची त्यास दाद मिळेल याचा मला विश्वास आहे. 

प्रश्न : हा चित्रपट फुटबॉलवर आधारित आहे. अशात तुला काही विशेष मेहनत घ्यावी लागली काय?
- रोज सकाळी ६ वाजता उठून आम्ही मुंबईच्या जुहू बीचवर जात होतो. त्याठिकाणी मुंबईच्या फुटबॉल टीमला आम्ही ज्वॉइन करायचो. टीमचे कोच दिनेश यांनी आम्हाला खूप चांगले ट्रेनिंग दिले. माझ्या भूमिकेसाठी मला स्वत:ला स्लीम करायचे होते. त्याकरिता मी डायटवर विशेष लक्ष दिले. त्याचबरोबर मला सहा ते सात किलो वजन कमी करावे लागले. हे सर्व करीत असताना मला एक गोष्ट समजली, ती म्हणजे तुम्ही जरी प्रोफेशनल फुटबॉलपटू नसाल; मात्र फुटबॉलचे चाहते असाल तर तुम्हाला तुमचे शरीर फुटबॉल या खेळाच्यादृष्टीने तयार करावे लागते. 

प्रश्न : आपल्या देशात क्रिकेट आणि हॉकीच्या तुलनेत फुटबॉलविषयी लोकांमध्ये फारशी क्रेझ नाही, असे तुला जाणवते काय?
- नाही, हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. त्याचबरोबर क्रिकेटविषयीदेखील भारतीयांमध्ये कमालीची क्रेझ आहे. परंतु या दोन खेळांबद्दल सांगत असताना हेदेखील आपल्याला विसरून चालणार नाही की, फुटबॉल, कबड्डी आणि टेनिससारख्या खेळांनादेखील प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. फुटबॉल या खेळाप्रतीची आवड तर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात बघावयास मिळत आहे. हे सर्व इंटरनेटच्या प्रसारामुळे घडत असावे असे मला वाटते. मला खात्री आहे की, लवकरच जागतिक स्तरावर भारतीय फुटबॉल संघ वर्चस्व गाजविताना दिसेल. 

प्रश्न : ‘तू हैं मेरा संडे’ आणि फुटबॉल हे सूत्र कसे जोडले गेले?
- ‘तू हैं मेरा संडे’ हा चित्रपट पाच तरुणांच्या एका ग्रुपवर आधारित आहे. या ग्रुपचे नाव ‘जेडीयू’ (जुहू बिच युनायटेड) असे असते. हे पाचही तरुण त्यांच्या-त्यांच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या कारणाने त्रस्त असतात. यातून स्वत:ला सावरण्यासाठी हे तरुण दर रविवारी जुहू बिचवर जाऊन फुटबॉल खेळत असतात. यादरम्यान ते त्यांच्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम विसरून जातात. एक दिवस जुहू येथे काही राजकारणी येतात. त्याचवेळी, खेळताना फुटबॉल त्यांना लागतो. याचा परिणाम म्हणून जुहू बीच येथे फुटबॉलसह इतरही खेळ खेळण्यावर बंदी आणली जाते. पुढे हे तरुण फुटबॉल खेळण्यासाठी मैदानाचा शोध घेतात. हा शोध घेत असताना त्यांना त्यांच्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तरे मिळतात. 

प्रश्न : सोशल मीडियाचा वाढत्या प्रभावाविषयी काय सांगशील? 
- मला असे वाटते की, सोशल मीडिया धारदार शस्त्राप्रमाणे आहे. आपण त्याचा कसा वापर करतो यावर या माध्यमाचा प्रभाव अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून सोशल मीडियाचा वापर करायला हवा असे मला वाटते. 

Web Title: Social media is a sharp weapon: Vishal Malhotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.