म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकी करायचा हे काम?वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2017 13:03 IST2017-07-07T07:33:09+5:302017-07-07T13:03:09+5:30

चंदेरी दुनियेतील बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार्सकडे पैसा,प्रतिष्ठा आणि प्रसिध्दी या सगळ्या गोष्टी आहेत. काहींना नशिबानं तर काहींनी मेहनतीनं कमावलं असेल. ...

So this is the work to do Nawazuddin Siddiqui? Read the details | म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकी करायचा हे काम?वाचा सविस्तर

म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकी करायचा हे काम?वाचा सविस्तर

देरी दुनियेतील बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार्सकडे पैसा,प्रतिष्ठा आणि प्रसिध्दी या सगळ्या गोष्टी आहेत. काहींना नशिबानं तर काहींनी मेहनतीनं कमावलं असेल. मात्र या सगळ्या कलाकारांनी या इंडस्ट्रीत येण्यापूर्वी वेगवेगळी काम करत आपले आज यश गाठले आहे. आज ऐशोआरामची लाईफ जगाणा-या सुपरस्टार्सनाही स्ट्रगल काही चुकलेले नाहीय. या सगळ्यांमध्ये एका अभिनेत्याचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल तो म्हणजे शाहरूख खान,सलमान खान, आमिर खान नाहीतर तो आहे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी. आज अनेकांचा लोकप्रिय अभिनेता  बनला आहे. मात्र इंडस्ट्रीत येण्याआधी नवाजुद्दीनचा  पहिला जॉब काय होता हे जाणून घेण्याची ब-याच जणांना उत्सुकता असेलही,नवाजुद्दीन सिद्दीकीआज बॉलिवूडच्या अनेक दिग्दर्शकांची पहिली पसंत आहे. मात्र अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून यश मिळवलेल्या नवाजुद्दीनला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. सुरुवातीला त्याला केमिस्टच्या दुकानात नोकरी करावी लागली.त्यानंतर सिनेमात येण्याआधी त्यानं वॉचमन म्हणूनही नोकरी केलीय.



अभिनयात त्याला आवड होती.संधीसाठी त्याने जवळपास 20 वर्ष वाट पाहिली. मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमात स्टेशनवर चोरी करणारा कलाकार आजचा आघाडीचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बनला आहे. मोठी भूमिका मिळेपर्यंत त्याने आपल्या आवडीपोटी छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. मात्र मोठी भूमिका मिळेपर्यंत त्याने जिद्द काही सोडली नाही.एखाद्या गोष्टींमध्ये तुमचा रस असेल तर तुम्ही दहा वर्षसुद्धा वाट पाहू शकता  त्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी सारखी आवड बाळगा असे अनेक दिग्गज नवोदिताना आनंदाने सांगताना दिसतात. श्रीदेवीसह 'मॉम' सिनेमातील नवाजुद्दीनच्या भूमिकेचेही विशेष कौतुक होत आहे.आगामी 'मुन्ना मायकल' सिनेमात झळकणार असून आगामी काळात दिग्दर्शिका नंदिता दास यांच्यां 'मंटो' सिनेमात झळकणार आहे. 

Web Title: So this is the work to do Nawazuddin Siddiqui? Read the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.