म्हणून... शाहरुखने दिली नाही ‘दंगल’ वर प्रतिक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 19:27 IST2017-01-13T17:52:53+5:302017-01-13T19:27:33+5:30

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या दंगल या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर कमाल करीत सर्वाधिक कमाई करणाºया हिंदी चित्रपटाचा मान ...

So ... Shahrukh did not give a response to 'riots'! | म्हणून... शाहरुखने दिली नाही ‘दंगल’ वर प्रतिक्रिया!

म्हणून... शाहरुखने दिली नाही ‘दंगल’ वर प्रतिक्रिया!

लिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या दंगल या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर कमाल करीत सर्वाधिक कमाई करणाºया हिंदी चित्रपटाचा मान मिळविला आहे. या चित्रपटाची व भूमिकांसाठी कलावंतांची बॉलिवूडच्या बहुतेक सर्व स्टार्सनी प्रशंसा केली आहे. सलमान खानने देखील दंगलची प्रशंसा केली, मात्र अद्याप शाहरुख खानची या चित्रपटाबाबत एकही प्रतिक्रिया आली नाही, यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

आमिर खानला नुकतेच एका मुलाखतीमध्ये ‘शाहरुख खानने ‘दंगल’वर प्रतिक्रिया दिली आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना आमिर म्हणाला, ’मला वाटत नाही की शाहरुखने आतापर्यंत हा चित्रपट पाहिला असावा, मला त्याचा फोनही आला नाही.’ दुसरीकडे जेव्हा ट्विटरवर एका व्यक्तीने शाहरुखला ‘तुला ‘दंगल’ हा चित्रपट कसा वाटला’ असा प्रश्न विचारला होता. यावर शाहरुखने सांगितले की, मी व्यस्त असल्याने मला आतापर्यंत हा चित्रपट पाहता आला नाही, परंतु, मी या चित्रपटाची सर्वत्र प्रशंसा होत असल्याचे ऐकतो आहे. मी लवकरच हा चित्रपट पाहता यावा यासाठी प्रयत्न करणार आहे’. 
आमिर खानने या ट्विटरवरील नोंदविलेल्या मताचे स्वागत केले आहे. आमिर म्हणाला, शाहरुख खानला ‘दंगल’ हा चित्रपट कसा वाटतो हे जाणून घेण्याची वाट पाहणार आहे.’




नितेश तिवारी दिग्दर्शित व आमिर खानची मुख्य भूमिका असणाºया ‘दंगल’ने बॉक्स आॅफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहेत. सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. दंगलने तिसºया आठवड्यापर्यंत ३४१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दहा दिवसांत २७० कोटींची कमाई केली होती हा देखील एक रेकॉर्ड आहे. नुकत्याच मिळालेल्या बॉक्स आॅफिसच्या रिपोर्टनुसार ‘दंगल’ने ३५९ कोटी रुपयांची कमाई करीत ३५० कोटींचा नवा क्लब तयार केला आहे. दंगची घोडदौड अशीच सुरू राहीली तर ४०० कोटी कमाई करणारा दंगल हा पहिला हिंदी चित्रपट ठरणार आहे. यामुळे हिंदी चित्रपटात दंगल नवा माईल स्टोन निर्माण करेल का अशीही उत्सुकता लागली आहे. 

शाहरुख खान सध्या आपल्या आगामी ‘रईस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘रईस’ हा चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होणार असून, त्याची हृतिक रोशनच्या ‘काबिल’ या चित्रपटासोबत प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: So ... Shahrukh did not give a response to 'riots'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.