- म्हणून शाहरूख खान सोडणार smoking and drinking!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 12:11 IST2017-03-19T06:41:32+5:302017-03-19T12:11:32+5:30
बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान हा चेनस्मोकर होता. होता, कारण आता तो चेनस्मोकर नसणार आहे. होय, शाहरूखने स्मोकिंगला गुड बाय ...

- म्हणून शाहरूख खान सोडणार smoking and drinking!
ब लिवूडचा किंगखान शाहरूख खान हा चेनस्मोकर होता. होता, कारण आता तो चेनस्मोकर नसणार आहे. होय, शाहरूखने स्मोकिंगला गुड बाय करण्याचा निर्धार केला आहे. केवळ स्मोकिंग नाही तर त्याने ड्रिंक सुद्धा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे, सिगारेट आणि मद्यपान या दोन्हींना शाहरूखने अलविदा म्हणण्यासाठी शाहरूख एकदम सज्ज आहे. याआधी अनेकदा शाहरूखने या वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न केलाय. पण प्रत्येकवेळी त्याला यात अपयशच आले. पण आता मात्र त्याचा निर्धार ठाम आहे. खरे तर यासाठी शाहरूखच्या मुलांना धन्यवाद घ्यावे लागतील. होय, कारण शाहरूखच्या या निर्धारामागे त्यांचाच हात आहे. आर्यन, सुहाना आणि चिमुकला अबराम या तिघांसाठी शाहरूखने सिगारेट आणि मद्यपान कायमचे सोडण्याचे ठरवलेय.
![]()
ALSO READ : SEE PICS : शाहरूख खान दिसू लागला म्हातारा (?)
काल एका कार्यक्रमात बोलताना खुद्द शाहरूखनेच ही माहिती दिली. मुलांना वेळ देता येते नाही,याची मला कायम खंत आहे. विशेषत: अबराम. मला सतत मी मुलांना वेळ देत नसल्याबद्दल अपराधी वाटते. काल रात्रीही मी हाच विचार करत होतो. मुलांकडे बघितले की, माझा सगळा क्षीण निघून जातो. पन्नासीच्या घरात, तुमच्यासोबत तुमचा चिमुकला खेळतोय, यापेक्षा आनंदी क्षण असूच शकत नाही. अबरामकडे पाहिल्यावर मला वेगळ्याच प्रेमाची अनुभूती येते. त्याचा निष्पाप चेहरा मला वेगळेच काही शिकवून जातो, असे शाहरूख म्हणाला. यानंतर शाहरूख जे बोलला ते ऐकून सगळेच भावूक झालेत. माझे आईवडिल मी पंधरा वर्षांचा असतानाच मला सोडून गेलेत. पण मला माझ्या मुलांसोबत आणखी २५-३० वर्षे तरी जगायचे आहे. जेव्हा तुम्हाला जगायची इच्छा असते तेव्हा आपोआप तुमच्या वाईट सवयी कमी होऊ लागतात. तुमची सिगारेटची सवय कमी होऊ लागते. ड्रिंक्स तुम्ही टाळू लागता. मी हे सगळे सोडण्याचा निर्धार केला आहे. आनंदी आणि निरोधी राहण्याचे माझे प्रयत्न आहेत. केवळ माझ्या मुलांसाठी मी हे करणार आहे, असे तो म्हणाला.