म्हणून रिअल लाइफमध्ये या अभिनेत्याला कॅट म्हणते ‘भैय्या म्होरे राखीं के बंधन को.....’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 11:02 IST2017-08-07T04:45:30+5:302017-08-07T11:02:17+5:30

बॉलिवूडमध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोणत्याही सणाचं सेलिब्रेशन धुमधडाक्यात आणि तितक्याच स्पेशल पद्धतीने करण्याची परंपरा बॉलिवूडमध्ये ...

So, in real life, the actor tells the actor, 'Bhaiyya mohore rakhi ke bandhan ko .......' | म्हणून रिअल लाइफमध्ये या अभिनेत्याला कॅट म्हणते ‘भैय्या म्होरे राखीं के बंधन को.....’

म्हणून रिअल लाइफमध्ये या अभिनेत्याला कॅट म्हणते ‘भैय्या म्होरे राखीं के बंधन को.....’

लिवूडमध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोणत्याही सणाचं सेलिब्रेशन धुमधडाक्यात आणि तितक्याच स्पेशल पद्धतीने करण्याची परंपरा बॉलिवूडमध्ये आहे. अशात रक्षाबंधनचा सण याला अपवाद कसा ठरेल.देशभरात रक्षाबंधन सणाची धूम आणि उत्साह असताना बॉलिवूडमध्ये भावा बहिणीच्या नात्याचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात येतं. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत सेलिब्रिटी मंडळी रक्षाबंधन हा सण साजरा करतात. आपल्या भावाला भेटणं शक्य नसेल तर शूटिंगच्या सेटवरही रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो.काही सेलिब्रिटी असे असतात की कुणाला सख्खा भाऊ नसतो तर कुणाला सख्खी बहिण नसते. अशावेळी त्यांच्या जीवनातील एखाद्या जवळच्या व्यक्तीला भाऊ किंवा बहिण मानून हा सण साजरा केला जातो. अभिनेत्री कॅटरिना कैफबाबतही असंच काहीसं आहे.कॅटरिनाला कुणीही भाऊ नाही. असं असलं तरी दरवर्षी कॅट रक्षाबंधनचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करते.कॅट कुणाला आपलं भाऊ मानते असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कॅटचा हा भाऊ चित्रपटसृष्टीतील एक अभिनेता आहे. या अभिनेत्याचं नाव आहे अभिनेता अर्जुन कपूर.कॅट अर्जुनला आपला मानलेला भाऊ मानते आणि दरवर्षी त्याला राखी बांधते.मात्र यंदा कॅटचा रक्षाबंधन साजरा होणार की नाही याबाबत साशंकता आहे.कारण कॅट सध्या तिच्या आगामी 'टायगर जिंदा है' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.त्यामुळे आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी कॅट शूटिंगचं शेड्युल सोडून येणार का याकडं आता नजरा लागल्या आहेत.दुसरीकडे अर्जुन कपूरचा 'मुबाँरका' हा सिनेमा नुकताच रुपेरी पडद्यावर झळकला आहे.आता आपली मानलेली बहिण रक्षाबंधनचा सण साजरा करण्यासाठी आपल्या सिनेमाचं शूटिंग सोडून येणार का याची प्रतीक्षा अर्जुन कपूरला लागलेली असणार.   

Web Title: So, in real life, the actor tells the actor, 'Bhaiyya mohore rakhi ke bandhan ko .......'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.