म्हणून आता 'रईस' सिनेमा दाखवला जाणार छोट्या पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 14:21 IST2017-09-20T08:51:55+5:302017-09-20T14:21:55+5:30
राहुल ढोलकिया यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रईस’ चित्रपटात शाहरूख खान हा रईसच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे. 1980 व 90 च्या दशकातील ...

म्हणून आता 'रईस' सिनेमा दाखवला जाणार छोट्या पडद्यावर
र हुल ढोलकिया यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रईस’ चित्रपटात शाहरूख खान हा रईसच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे. 1980 व 90 च्या दशकातील रईस ही केवळ एक व्यक्ती नसते. तो एक समांतर सरकार चालवीत असतो, तो कायद्याचा गुन्हेगार असतो आणि सामान्य गररीब जनतेसाठी एक रॉबिन हूड! जरी तो एक गुन्हेगार असला, तरी सामान्य नाडल्या गेलेल्यांचा तो आवाज होतो. ‘ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपटांचे स्वगृह’ असलेली ‘झी सिनेमा’ वाहिनी येत्या रविवारी, 24 सप्टेंबर रोजी रात्री 9.00 वाजता ‘रईस’ या गुन्हेगारीपटाचा प्रीमिअर प्रसारित करणार आहे. गुन्हेगार असला, तरी रईस हा मनाने दिलदार असतो. आपल्याशी प्रतारणा करणार््या आपल्याच गुरूला गोळी घालण्यापूर्वी त्याच्या डोळ्य़ांत पाणी येते! तो स्थानिक शाळेसाठी हजारो रुपयांची पुस्तके दान देतो, आपल्या पत्नीला खुश करण्यासाठी स्वैपाक करतो आणि महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी त्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदतही करतो. असे असले, तरी तो एक गुन्हेगार असतो आणि तो पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात नेहमीच पुढे राहतो. रईसची कथा गुजरातमधील बेकायदा दारूचा व्यापार करणा-या एका तस्कराच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगण्यात येते. चित्रपटात नवाजुद्दिन सिद्दिकी, अतुल कुलकर्णी, माहिरा खान, नरेन्द्र झा, जयदीप अहलावट यासारख्या दिग्गज कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात प्रथमच संवेदनशील अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी आणि शाहरूख खान हे एकत्र भूमिका साकारीत आहेत.नवाजुद्दिनने यात नर्म विनोदी वृत्तीचा, अतिशय प्रामाणिक, धाडसी, हुशार आणि रईसच्या अगदी उलट्य़ा स्वभावाचाआयपीएस अधिकारी रंगविला आहे. त्यांच्यातील संवादांची जुगलबंदी, तसेच ‘कोई धंदा छोटा नहीं होता और धंदे से बढकर कोई धरम नहीं होता’,‘बनिये की दिमाग और मियाभाई की डेअरिंग दोनो है इसके पास’, ‘मोहल्ला बचाते बचाते शहर जला दिया’ यासारख्या वाक्यांमुळे आणि ‘जालिमा’, ‘उडी उडी’, ‘लैला मैं लैला’ यासारख्या जबरदस्त लोकप्रियसंगीतामुळे हा चित्रपट पाहणे विलक्षण रंजक बनले आहे. यातील काही अॅक्शन प्रसंग अतिशय थरारक असून वेगवानपाठलागाची दृष्येही अंगावर रोमांच उभे करतात. तस्करीचा व्यवसाय आणि राजकारणातील अनेक डावपेच यांचे त्यातबारकाईने दर्शन घडते. गुन्हेगार व्यक्ती नायकाच्या भूमिकेत असलेले असंख्य चित्रपट अमिताभ बच्चन यांनी रंगविले असून त्यांनी रईसमधील
भूमिकेबद्दल शाहरूख खानचे अभिनंदन करताना म्हटले होते, “अभिनंदन, शाहरूख!… रईस… त्यातला तुझा संताप आवडला. काही प्रसंग खरोखरच धक्कादायक होते.”रईस (शाहरूख खान) हा लहान असतानाच दारूची तस्करी करण्यातील काही खुब्या शिकतो आणि मोठेपणी आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतो. एसीपी मुजुमदार (नवाजुद्दिन सिद्दिकी) याची बदली जेव्हा रईसच्या विभागात होते, तेव्हा त्याला त्याचा प्रतिस्पर्धी मिळतो आणि मग दोघांमध्ये शह-काटशहाचा खेळ सुरू होतो. तस्करीत प्रचंड पैसा आणि प्रभाव मिळविलेला रईस नंतर राजकारणात उतरतो आणि आपल्या शत्रूंची संख्या कैकपटीने वाढवितो. अखेरीस त्याच्या निकटचेच त्याचा विश्वासघात करतात. गुजरातमधील या सर्वात खतरनाक गुंडाच्या नशिबात काय मांडून ठेवलेले असते?जाणून घेण्यासाठी शाहरूख खानचा ‘रईस’सिनेमा पाहणे रंजक ठरणार आहे.