- म्हणून कटप्पाने बाहुबलीला मारले...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 09:37 IST2017-03-09T04:07:21+5:302017-03-09T09:37:21+5:30

‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायला तुम्ही उत्सूक आहात. तर तुम्हाला ‘बाहुबली2’ रिलीजची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. होय, कारण ‘बाहुबली2’ रिलीज होण्यापूर्वीच या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहेत. खुद्द कटप्पानेच हे उत्तर दिले आहे.

- So Katpapan killed Bahubali ... !! | - म्हणून कटप्पाने बाहुबलीला मारले...!!

- म्हणून कटप्पाने बाहुबलीला मारले...!!

टप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायला तुम्ही उत्सूक आहात. तर तुम्हाला ‘बाहुबली2’ रिलीजची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. होय, कारण ‘बाहुबली2’  रिलीज होण्यापूर्वीच या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहेत. खुद्द कटप्पानेच हे उत्तर दिले आहे. सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज यांना थेट एक प्रश्न विचारला गेला. तो म्हणजे, ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’. या प्रश्नावर सत्यराज क्षणभर हसले. मी जगात कुठेही गेलो तरी मला सगळे लोक याच प्रश्नाचं उत्तर मागतात, असे ते म्हणाले. आता सत्यराज या प्रश्नाचे उत्तर शिताफीने टाळणार असे वाटत असतानाच पुढच्या क्षणाला त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकले. हो! आता सत्यराज यांनी काय उत्तर दिले, हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला पुढची बातमी वाचावी लागेल.  
 कटप्पाने बाहुबलीला मारले कारण, त्याच्या दिग्दर्शकाने त्याला तसे करायला सांगितले, असे सत्यराज म्हणाले. त्यांच्या या उत्तरावर सगळीच खसखस पिकली, हे सांगायला नकोच. ‘बाहुबली2’चे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनाही हाच प्रश्न विचारण्यात आला. त्यांनीही तेच उत्तर दिले. मी कटप्पाला बाहुबलीस मारायला सांगितले आणि म्हणून त्याने मारले.



आता सत्यराज काय आणि राजमौली काय, शेवटी क्लायमॅक्सचा खुलासा करणार नाहीतच. कारण शेवटी नैतिकतेचा प्रश्न आहे. रिलीजपूर्वी क्लायमॅक्सचा खुलासा करणे कुठल्याही नैतिकतेत बसत नाही. एकंदर काय, तर तूर्तास सत्यराज यांच्या याच उत्तरावर तुम्हाला समाधान मानावे लागणार आहे आणि ‘बाहुबली2’ची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 
 

Web Title: - So Katpapan killed Bahubali ... !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.