‘सो कॉल्ड’ ‘industry people’वर का बरसली HOT इशा गुप्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 16:09 IST2017-09-01T10:39:49+5:302017-09-01T16:09:49+5:30

अलीकडे आपल्या सेमी-न्यूड, न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेली इशा गुप्ता नाराज आहे. अहो, कुणावर काय? इंडस्ट्रीतल्या ‘सो कॉल्ड’ माणसांवर. होय, ...

'So Called' 'Industry People' Years HOT Isha Gupta? | ‘सो कॉल्ड’ ‘industry people’वर का बरसली HOT इशा गुप्ता?

‘सो कॉल्ड’ ‘industry people’वर का बरसली HOT इशा गुप्ता?

ीकडे आपल्या सेमी-न्यूड, न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेली इशा गुप्ता नाराज आहे. अहो, कुणावर काय? इंडस्ट्रीतल्या ‘सो कॉल्ड’ माणसांवर. होय, इशाने आपली ही नाराजी बेधडकपणे बोलून दाखवली आहे.
इशाने २०१२ मध्ये ‘जन्नत2’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केले. त्याच वर्षी तिला ‘राज ३डी’ आणि ‘चक्रव्यूह’ हे आणखी दोन सिनेमे मिळाले. यानंतर पुढेही इशाच्या हाताला काम मिळत गेले. पण तरीही इशाचे मानाल तर अद्यापही तिच्यासोबत दुजाभाव होतोय.  आजही मला इंडस्ट्रीतील ‘सो कॉल्ड’ लोकांकडून ‘आऊटसाईडर’ म्हणून वागवले जाते, अशा शब्दांत इशाने आपली नाराजी बोलून दाखवली आहे. म्हणजेच, कंगना राणौत हिच्याप्रमाणे आता इशानेही बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात तोंड उघडले आहे.
मी बॉलिवूडमध्ये आले, तेव्हाच हा प्रवास सोपा नाही, हे मला कळून चुकले होते. कदाचित माझे आडनाव गुप्ता ऐवजी वेगळे असते (मोठ्या स्टारकिड्सला उद्देशून) तर हा प्रवास इतका कठीण झाला नसता. एकापाठोपाठ एक चार सिनेमे फ्लॉप झाल्यानंतरही एखाद्या बड्या निर्मात्याने माझा चित्रपट प्रोड्यूस करावा, असे मला अनेकदा वाटते. पण गुप्ता आडनाव असल्याने ते शक्य नाही, ही जाणीव मला करून दिली जाते. बॉलिवूडमधील लोक सतत त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून मी आऊटसाईडर आहे, हे मला सांगत असतात. अर्थात मी त्यांना फार दोष देणार नाही. कारण मी कधीच त्यांच्यातील एक होण्याचे प्रयत्न केले नाहीत. मला ते करायचेही नाही. मी अधिकाधिक नेटवर्कींग करून मोठ मोठे प्रोजेक्ट मिळवावेत, असा सल्ला मला इथल्या अनेकांनी दिला. पण हे नेटवर्कींग कसे करतात, हे मला ठाऊक नाही आणि मला ते जाणून घेण्याची इच्छाही नाही. माझा फंडा साधा सोपा आहे. मी आणि माझे काम आवडत असेल तर काम द्या. मला कुठलाही फायदा लाटायचा नाही. आजपर्यंत मी जे काम केले. त्याचा मला अभिमान आहे. कारण हे काम मी स्वबळावर मिळवले आहे, असे इशा म्हणाली.

ALSO READ :  ‘टॉपलेस’ झाली इशा गुप्ता ; ट्रोल करणा-यांना ‘नो एन्ट्री’!!
 

Web Title: 'So Called' 'Industry People' Years HOT Isha Gupta?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.