- म्हणून तुटला करिश्मा कपूर व अभिषेक बच्चनचा साखरपुडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 12:15 IST2017-02-05T06:45:38+5:302017-02-05T12:15:38+5:30

अभिषेक बच्चन याचा आज (५ फेब्रुवारी) वाढदिवस. ज्युनिअर बच्चनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याच आयुष्यातील काही खास गोष्टी...खास तुमच्यासाठी... खरे तर ऐश्वर्या ...

- So, broken stars Karishma Kapoor and Abhishek Bachchan? | - म्हणून तुटला करिश्मा कपूर व अभिषेक बच्चनचा साखरपुडा?

- म्हणून तुटला करिश्मा कपूर व अभिषेक बच्चनचा साखरपुडा?

िषेक बच्चन याचा आज (५ फेब्रुवारी) वाढदिवस. ज्युनिअर बच्चनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याच आयुष्यातील काही खास गोष्टी...खास तुमच्यासाठी...

खरे तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लव्हस्टोरी बरीच इंटरेस्टिंग आहे. पण ऐश्वर्या हे अभिषेकचे पहिले प्रेम नव्हते. ऐश्वर्याच्या आधीसुद्धा अभिषेकच्या आयुष्यात अनेक महिला आल्या होत्या.अभिषेकच्या आयुष्यातील सर्वात पहिली महिला कोण होती, तर करिश्मा कपूर. या दोघांची लव्ह स्टोरी कुणापासूनही लपून राहिलेली नाही. या दोघांचा साखरपुडाही झाला होता, असेही म्हटले जाते. करिश्मा व अभिषेक परस्परांना लहानपणापासून ओळखत होते. अभिषेकची मोठी बहीण श्वेता हिच्या लग्नात अभि व करिश्मा जरा जास्तच जवळ आलेत.



अभिषेकच्या पहिल्या चित्रपटात करिश्माची लहान बहीण करिना हिरोईन होती. करिना अभिषेकला जीजू म्हणूनच हाक मारायची. अमिताभ यांनी आपल्या ६० व्या वाढदिवशी करिश्मा व अभिषेक यांच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि सगळ्या जगापुढे या नात्याचा खुलासा झाला. पण यानंतर काही असे झाले की, हे लग्न मोडले. करिश्माची आई बबीता हिला अभिषेक फारसा आवडत नव्हता. या काळात अभिषेकचे सगळे चित्रपट फ्लॉप गेलेत. याऊलट करिश्मा त्याकाळातील सुपरहिट हिरोईन होती. अभिषेक अपयशी ठरला तर काय, याची बबीता यांना भीती होती. आईच्या या भीतीपोटी करिश्मा मागे हटली व तिने हा साखरपुडा तोडला.



करिश्मासोबत साखरपुडा तुटल्यानंतर अभिषेकचे मन राणी मुखर्जीवर आले. मणिरत्नम यांच्या ‘युवा’ या चित्रपटादरम्यान दोघांमधील जवळीक वाढली. दोघांचीही आॅन आणि आॅफ केमिस्ट्री लोकांना चांगलीच भावली. पण यावेळी अभिषेकची आई जया बच्चन यांनी राणीला विरोध केला. आईने अभिषेकला राणीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि त्याचमुळे राणी बच्चन कुटुंबाची सून बनता बनता राहिली.



यानंतर अभिषेकच्या आयुष्यात ऐश्वर्या आली. अभिषेक व ऐश्वर्याने बरेच चित्रपट एकत्र केले होते. पण त्याकाळात ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमान खान आणि नंतर विवेक ओबरॉय होते. पण या दोघांशीही ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले. यानंतर ‘गुरु’ या चित्रपटाच्या सेटवर अभिषेक आणि ऐश्वर्या जवळ आलेत. ‘गुरु’च्या सक्सेस पार्टीदरम्यान अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले. यानंतर एप्रिल २००७ मध्ये दोघांचे लग्न झाले.

Web Title: - So, broken stars Karishma Kapoor and Abhishek Bachchan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.