इलियाना डिक्रूजला अशा अवस्थेत बघून घाबरला सिंघम अजय देवगण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 19:38 IST2017-09-02T14:08:07+5:302017-09-02T19:38:07+5:30
मल्टीस्टारर ‘बादशाहो’ हा चित्रपट रिलीज झाला असून, प्रेक्षकांकडून त्यास सरासरी प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात अजय देवगणसह इमरान हाशमी, इलियाना ...

इलियाना डिक्रूजला अशा अवस्थेत बघून घाबरला सिंघम अजय देवगण!
म ्टीस्टारर ‘बादशाहो’ हा चित्रपट रिलीज झाला असून, प्रेक्षकांकडून त्यास सरासरी प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात अजय देवगणसह इमरान हाशमी, इलियाना डिक्रूज, ईशा गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका असून, सगळ्यांचीच अदाकारी बघण्यासारखी आहे. इलियानाने या चित्रपटासंबंधी एक किस्सा सांगितला असून, तो ऐकूण सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कारण बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अजय देवगण चक्क तिला घाबरल्याचे तिने सांगितले आहे.
इलियानाने म्हटले की, जेव्हा ‘बादशाहो’च्या शूटिंगचा अखेरचा दिवस होता तेव्हा मी खूपच भावुक झाली होती. मी लहान मुलासारखी रडत होते. मला रडताना बघून अजय देवगण घाबरून गेला होता. टीव्ही मालिका ‘यार मेरे सुपरस्टार’ सीजन-२मध्ये इलियाना सहभागी झाली होती. इलियानाने म्हटले की, ‘मी खूपच भावुक झाली होती. त्यामुळे सोशल मीडियावर चित्रपटाशी संबंधित बरेचसे फोटो मी पोस्ट केले होते. माझे रडने थांबतच नव्हते, जेव्हा अशा अवस्थेत मला अजयने बघितले तेव्हा त्याला खूपच टेन्शन आले. तो अक्षरश: घाबरून गेला होता. त्याने विचारले, ‘काय झाले?’ पण माझे रडने काही थांबत नव्हते. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच सेटवर एवढी रडली’ असेही इलियाना म्हणाली.
![]()
‘यार मेरे सुपरस्टार सीजन-२मध्ये इलियाना ईशा गुप्ता आणि इमरान हाशमी यांच्यासोबत सहभागी झाली होती. इलियानाने म्हटले की, ‘अन्य सेट्सवर एक किंवा दोन अश्रू टपकतात. मात्र हा सेट्स असा होता, ज्यावर मी ढसाढसा रडले. मला माझे अश्रू आवरणे अशक्य झाले होते. इलियानाप्रमाणे ईशानेदेखील काहीसा असाच किस्सा सांगितला होता. हा चित्रपट मल्टीस्टारर असल्याने यामध्ये अनेक कलाकार बघावयास मिळत आहेत. चित्रपटात शूटिंगदरम्यान आम्हा सर्व कलाकारांमध्ये चांगली ट्यूनिंग जमली होती, त्याच कारणाने आमच्यात एकप्र्रकारचा जिव्हाळा निर्माण झाला होता.
या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास, पहिल्याच दिवशी चित्रपटाने २५ ते ३० टक्के ओपनिंग केली. पहिल्याच दिवसाचे कलेक्शन १२.०३ कोटी होते. जर या चित्रपटाने वीकेंडला चांगली कमाई केली तर चित्रपट ५० ते ५५ कोटी रुपयांपर्यंत मजल मारू शकेल. हा चित्रपट तीन हजार २४२ स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला आहे. त्यातील २८०० स्क्रीन भारतातील असून, ४४२ स्क्रीन्स विदेशातील आहेत. जर या चित्रपटाने १२५ कोटी रुपयांचे बॉक्स आॅफिस कलेक्शन केल्यास चित्रपट सुपरहिट ठरेल. सध्या ट्रेंडगुरूचे या चित्रपटाकडे लक्ष लागून आहे.