"सिंगर्सला मिळतात फक्त १०१ रुपये फीस", 'बेबी डॉल' फेम गायिकेनं केली म्युझिक इंडस्ट्रीची पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 17:27 IST2025-08-18T17:24:42+5:302025-08-18T17:27:22+5:30
'बेबी डॉल' आणि 'चिट्टियां कलाइयाँ' सारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेली गायिका कनिका कपूर(Kanika Kapoor)ने अलीकडेच म्युझिक इंडस्ट्रीची पोलखोल केली आहे.

"सिंगर्सला मिळतात फक्त १०१ रुपये फीस", 'बेबी डॉल' फेम गायिकेनं केली म्युझिक इंडस्ट्रीची पोलखोल
बेबी डॉल आणि चिट्टियां कलाइयाँ सारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेली गायिका कनिका कपूर(Kanika Kapoor)ने अलीकडेच म्युझिक इंडस्ट्रीची पोलखोल केली आहे. तिने उर्फी जावेदसोबत 'बंक विथ उर्फी' या शोमध्ये बोलताना खुलासा केला की, भारतातील गायकांना त्यांच्या कामाचे पुरेसे पैसे मिळत नाहीत. यासोबतच तिने हेदेखील सांगितले की, मग त्यांना नेमके पैसे कसे मिळतात.
जेव्हा उर्फीने कनिकाला तिच्या एका व्हायरल गाण्याबद्दल विचारले, ज्यासाठी तिला पैसे मिळाले नाहीत, तेव्हा कनिकाने हे मान्य केले की गायकांना त्यांच्या गाण्यांसाठी सामान्यतः पैसे मिळत नाहीत. ती म्हणाली, "गायकांना खरंच पैसे मिळत नाहीत. मी तुम्हाला सर्व कॉन्ट्रॅक्ट्स दाखवते, फक्त १०० रुपये मिळतात." ती पुढे म्हणाली, "ते सांगतात की ते तुमच्यावर उपकार करत आहेत. मी तुम्हाला भारतातील एका खूप मोठ्या गायकाबद्दल सांगू शकते. मी नाव घेणार नाही, पण त्यांना त्यांच्या अनेक गाण्यांसाठी पैसे मिळत नाहीत. त्यांच्याकडे कोणतेही पब्लिशिंग हाऊस नाही किंवा रॉयल्टीचा कोणताही नियम नाही. आज भारतात असे काहीच अस्तित्वात नाही."
गायक कसे पैसे कमवतात?
गायक कसे पैसे कमावतात असे कनिका कपूरला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, "जर तुम्ही जिवंत असाल आणि गाण्यास सक्षम असाल, तुमचा आवाज काम करत असेल आणि तुम्ही शो करण्यास सक्षम असाल तरच. जोपर्यंत तुम्ही शो करत असाल तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील. जर उद्या काही घडले तर गायकांसाठी पेन्शन योजना पण नाही." तिने पुढे स्पष्ट केले की, जरी तिने सर्वांचे करार पाहिले नसले तरी, वास्तविकता अशी आहे की गायकांना त्यांच्या गाण्यांसाठी फक्त १०१ रुपये मिळतात
वर्कफ्रंट
रागिनी एमएमएस २ (२०१४) या चित्रपटातील बेबी डॉल या तिच्या चार्टबस्टर गाण्यातून कनिकाला लोकप्रियता मिळाली. या यशानंतर कनिकाने लवली (हॅपी न्यू इयर), चिट्टियां कलैयां (रॉय), देसी लूक (एक पहेली लीला) आणि बीट पे बूटी (अ फ्लाइंग जट) यासह अनेक हिट गाणी दिली आहेत.