Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 10:53 IST2025-07-09T10:52:18+5:302025-07-09T10:53:09+5:30
आत्महत्येचा प्रयत्न की स्टंटबाजी? प्रसिद्ध गायकाचा व्हिडिओ व्हायरल

Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
मुंबईतील बांद्रा वरळी सी-लिंकवरील एक व्हिडिओ व्हायरल होतोय. बॉलिवूड गायक यासेर देसाई (Yasser Desai) सी लिंकच्या रेलिंगवर चढलेला दिसत आहे. आत्महत्या करण्यासाठी की स्टंटबाजी करण्यासाठी तो अशा प्रकारे चढला असाच प्रश्न अनेकांना पडला. त्याच्याविरोधात पोलिसांनी अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गायक, संगीतकार यासेर देसाई व्हाईट स्लीव्हलेस शर्ट आणि पँट अशआ पेहरावात दिसत आहे. बांद्रा-वरळी सी लिंकवरच्या मधोमध असलेल्या रेलिंगवर तो चढलेला आहे. हात पसरुन तो समुद्राच्या दिशेने बघत आहे. यासेर त्याच्या आगामी गाण्यासाठी शूट करत होता असं तपासात समोर आलं. मागून येणाऱ्या जाणाऱ्यां वाहनचालकांनी त्याचा व्हिडिओ काढला. आता बांद्रा पोलिसांनी यासेरविरोधात BNS कलम २८५, २८१, आणि १२५ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणी कारवाई करत आहेत.
या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 'हा यासेर आहे?', 'चांगली मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे', 'याला काय झालं? आत्महत्या करतोय का?' असं म्हणत काही लोकांनी काळजीही व्यक्त केली.
यासेर देसाईने हिंदी सिनेसृष्टीत अनेक गाणी गायली आहेत. २०१६ साली आलेल्या 'बेईमान लव' सिनेमातील गाण्यातून त्याने करिअरला सुरुवात केली. 'ड्राईव्ह'मधलं 'मखना','शादी मे जरुर आना' सिनेमातलं 'जोगी', आणि 'पल्लो लटके', 'गोल्ड' मधलं 'नैनो ने बांधी ऐसी डोर' ही गाणी गायली आहेत.