या गायिकेला दुसरी लता मंगेशकर बनवायचे होते गुलशन कुमार यांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 16:43 IST2017-10-12T08:00:09+5:302017-10-12T16:43:34+5:30
सत्तरच्या दशकात इंटस्ट्री एक नवा गावाज लोकांच्या कानावर पडत होता. त्यावेळी लता मंगेशकर, आशा भोसले आणि अलका याज्ञिक या ...

या गायिकेला दुसरी लता मंगेशकर बनवायचे होते गुलशन कुमार यांना
स ्तरच्या दशकात इंटस्ट्री एक नवा गावाज लोकांच्या कानावर पडत होता. त्यावेळी लता मंगेशकर, आशा भोसले आणि अलका याज्ञिक या गायिकांनी आपल्या गोड आवाजाने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. या नव्या आवाजाला गुलशन कुमार दुसरी लता मंगशेकर बनवू इच्छित होते. या गायिकेच नाव आहे अनुराधा पौडवाल. ज्यांना लोक टी-सीरिजच्या नावाने सुद्धा ओळखतात. अनुराध पौडवाल यांनी आपल्या सिंगिग करिअरची सुरुवात 1973 साली केली. अमितभा बच्चन आणि जया बच्चन यांच्या अभिमान चित्रपटाने त्यांनी सुरुवात केली खरी पण त्यांना मोठा पहिला ब्रेक मिळाला तो सुभाष घई यांच्या 'कालीचरण' चित्रपटातून. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अनुराध पौडवाल यांनी राजेश रोशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी आणि जयदेव यांच्या सारख्या अनेक संगीतकांरासोबत काम केले. एकपेक्षा एक हिट गाणी त्या गात होत्या आणि रोज यशाचे नवे शिखर गाठत होत्या. त्यावेळी गुलशन कुमार यांची म्युजिक कंपनी टी-सीरिजचे खूप नाव होत. प्रत्येकाला त्यांच्यासोबत काम करायचे होते. अनुराध पौडवाल यांनी टी-सीरिजसाठी गायला सुरुवात केली.
आशिकी, दिल है कि मानता नही, बेटा यासारख्या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना सलग तीन वेळा फिल्मफेयर अॅवॉर्ड मिळाला. त्यादरम्यान अनुराध पौडवाल या गुलशन कुमार यांच्या आवडत्या गायिका बनल्या. जिकडे तिकडे ते अऩुराध पौडवाल यांना सपोर्ट करायला लागले. दोघांमध्ये काही तरी शिजते आहे अशा चर्चा दबक्या आवाजात सुरु झाल्या. यानंतर संगीतकार ओपी नायर यांनी सांगितले होते की लता मंगेशकर यांचा काळ आता संपला आहे, अनुराध यांनी त्यांना रिप्लेस केले आहे. मात्र यापेक्षा गुलशन कुमार यांनी केले होते. अनुराध पौडवाल यांना सांगितले मी तुला दुसरी लता मंगेशकर बनवेन. यानंतर एक दिवशी अनुराध पौडवाल यांनी एक खळबळजनक वक्तव्य करुन सगळ्यांना पेचात टाकले. अनुराधा म्हणाल्या मी फक्त यापुढे टी-सीरिजसाठीच गाणार आणि हाच निर्णय त्यांच्या करिअरसाठी घातक ठरला. पुढे अनेक वर्ष त्यांनी कोणत्याच म्युझिक कंपनीसाठी गायले नाही. त्या फक्त भजन आणि आरत्या गात होत्या.