या महिन्याच्या अखेरिस लग्नबंधनात अडकणार नेहा कक्कर?  कोण आहे तिचा भावी पती?

By रूपाली मुधोळकर | Published: October 5, 2020 10:20 AM2020-10-05T10:20:20+5:302020-10-05T10:25:15+5:30

 होय, नेहा या महिन्याच्या अखेरिस लग्न करणार असे मानले जात आहे.

singer Neha Kakkar may be tying the knot soon with her long time friend Rohanpreet Singh | या महिन्याच्या अखेरिस लग्नबंधनात अडकणार नेहा कक्कर?  कोण आहे तिचा भावी पती?

या महिन्याच्या अखेरिस लग्नबंधनात अडकणार नेहा कक्कर?  कोण आहे तिचा भावी पती?

googlenewsNext
ठळक मुद्दे‘आजा चल लॉकडाऊन विच व्याह कराइए कट होन खरचे,’ या गाण्यात नेहा व रोहनप्रीत एकत्र दिसले होते.

आपल्या आवाजाने तरूणाईला वेड लावणारी बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर सध्या पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत असते. कधीकाळी नेहा आणि अभिनेता हिमांश कोहली कधी काळी एकमेकांच्या प्रेमात होते. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. अनेक प्रयत्नानंतर नेहा ब्रेकअपच्या या दु:खातून बाहेर आली. यानंतर ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर असा काही ड्रामा रंगला की नेहा उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणसोबत लग्न करणार, अशा चर्चा रंगल्या. आता पुन्हा एकदा नेहाच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. होय, नेहा या महिन्याच्या अखेरिस लग्न करणार असे मानले जात आहे.

ई-टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. आता नेहाचा होणारा पती कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचे नाव आहे. रोहनप्रीत सिंह. रोहनप्रीत सिंहचे नाव तुम्ही याआधीही ऐकले असेलच. ‘इंडियाज् राईझिंग स्टार 2’ या म्युझिक रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि या शोचा तो फर्स्ट रनरअप होता. याशिवाय ‘मुझसे शादी करोगे’ या वेडिंग रिअ‍ॅलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता. याच रोहनप्रीतसोबत नेहा लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.

नेहा व रोहनप्रीत खूप जुने मित्र आहेत. अलीकडे दोघेही एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र दिसले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा व रोहनप्रीत या महिन्याच्या अखेरिस लग्न करू शकतात. दिल्लीत हा विवाह सोहळा होणार असल्याचे कळते. यासंदर्भात नेहाने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रोहनप्रीतच्या मॅनेजरने मात्र यावर प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही सुद्धा या लग्नाच्या चर्चा ऐकल्या आहेत. पण नेहा व रोहनप्रीत यांनी अलीकडे एक सिंगल एकत्र केले. कदाचित त्यामुळे त्यांचे नाव जोडले जात असावे. तूर्तास रोहनप्रीतचा लग्नाचा कुठलाही इरादा नाही,’ असे मॅनेजरने स्पष्ट केले. आता खरच म्युझिक व्हिडीओमुळे या चर्चा सुरु झाल्यात की नेहा व रोहनप्रीत खरोखरच लग्न करणार, हे लवकरच कळेल. सूत्रांनी मात्र लग्नाची बातमी पक्की असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडिया पोस्टची चर्चा
‘आजा चल लॉकडाऊन विच व्याह कराइए कट होन खरचे,’ या गाण्यात नेहा व रोहनप्रीत एकत्र दिसले होते. नेहाने अलीकडे तिच्या इन्स्टास्टोरीवर या पंजाबी गाण्याचे बोल पोस्ट केले होते. यानंतर रोहनप्रीतनेही नेहासोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात बॅकग्राऊंडमध्ये ‘डायमंड द छल्ला’ हे गाणे वाजत होते. व्हिडीओत रोहन नेहाच्या बोटात अंगठी घालताना या व्हिडीओत दिसला होता.

एक स्पर्धक ते परीक्षक असा आहे नेहा कक्करचा प्रवास, गेल्या काही वर्षांत झालाय चांगलाच मेकओव्हर

माझ्या नावाचा वापर थांबव नाहीतर...! नेहा कक्कर भडकली, एक्स-बॉयफ्रेन्डला दिली ताकीद

ती टीव्हीवर रडली अन् मी विलन ठरलो...! नेहा कक्करसोबतच्या ब्रेकअपवर बोलला हिमांश कोहली

नेहा सध्या एका सिंगिंग रियालिटी शोची जज आहे. शिवाय तिने बॉलीवुमध्ये गायिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विशेष म्हणजे ज्या शोमध्ये ती जज आहे त्याच शोमधून तिने तिच्या करियरची सुरूवात केली होती. याच शोच्या दुसऱ्या सीजन पासून केली होती. जेव्हा नेहा 11वीमध्ये होती. तेव्हा ती कंटेस्टेंट म्हणून या शो मध्ये गेली होती. 
या शोमध्ये ती त्यावेळी यश मिळवू शकली नाही. तिल रिजेक्ट करण्यात आलं होतं. तरीही ती खचली नाही. मोठ्या मेहनतीने तिने स्वतःची यशस्वी गायिका अशी ओळख निर्माण केली. नेहा आज बॉलिवूडच्या टॉप सिंगर्सपैकी एक आहे. ती गाण्याचे 10 ते 15 लाख रुपये ती मानधन घेते. एखाद्या सिनेमात तिला गाणे कंपोज करण्यासाठी घेतले गेले तर ती दोन ते तीन लाख रुपये महिन्याला घेते. 

Web Title: singer Neha Kakkar may be tying the knot soon with her long time friend Rohanpreet Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.