'तमाशा'चे असेही प्रमोशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:59 IST2016-01-16T01:14:49+5:302016-02-10T10:59:40+5:30
रणबीर कपूर व दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असणार्या इम्तियाज अली दिगदर्शित 'तमाशा' या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. ...

'तमाशा'चे असेही प्रमोशन
र बीर कपूर व दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असणार्या इम्तियाज अली दिगदर्शित 'तमाशा' या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
अलिकडे चित्रपटाच्या प्रमोशनवर खूप भर दिला जातो आणि त्याचा फायदा बॉक्स ऑफिसवर होत असतो. 'तमाशा'च्या प्रमोशनसाठीही अशीच एक भन्नाट आयडिया लढवण्यात आली.
चित्रपटाच्या प्रमोशन प्लॅनवर चर्चा करण्यासाठी रणबीर, दीपिका आणि इम्तियाज अली एकत्र येतात व जी चर्चा करतात त्याचा एक व्हिडिओ बनविण्यात आला आहे.
तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ फारच रंजक आहे.

तमाशाच्या प्रमोशनसाठी विविध प्लॉटफार्मचा वापर करावा असा तिघांचाही सूर असला तरी तिघांचे मुद्दे वेगवेगळे असल्याने त्यांच्यात वाद झाल्याचेही यात दिसते.
दीपिकाने रियॅलिटी शोमध्ये जाऊन प्रमोशन करण्याचा मुद्दा मांडला. मसंदसारख्या समिक्षकांसोबत मुलाखतीचा पर्यायही तिने सूचवला, तो इम्तियाजला आवडला. दुसरीकडे मात्र रणबीर अस्वस्थ दिसत आहे कारण 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे आणि त्यातच हे तमाशाचे प्रमोशन करावे लागणार आहे.