Corona Virus : पहिले श्रेय मोदींचे...! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने केले पंतप्रधानांचे कौतुक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 10:06 AM2020-04-12T10:06:10+5:302020-04-12T10:07:49+5:30

डॉक्टर, नर्स, पोलिस यांचेही मानलेत आभार

simi garewal tweet on covind 19 india says first credit goes to pm narendra modi-ram | Corona Virus : पहिले श्रेय मोदींचे...! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने केले पंतप्रधानांचे कौतुक!!

Corona Virus : पहिले श्रेय मोदींचे...! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने केले पंतप्रधानांचे कौतुक!!

googlenewsNext

कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढत असताना वेगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील स्थिती ज्या पद्धतीने हाताळत आहेत त्याबद्दल अनेकजण मोदींच्या कामाचे कौतुक करत आहे. आता बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री सिमी गरेवाल यांनीही मोदींच्या कामाचे कौतुक केले आहे.

 ‘भारतात ज्या पद्धतीने करोनाची स्थिती हाताळली जात आहे. त्याबद्दल मला आज अभिमान वाटत आहे. याचे पहिले श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जाते. त्यांनी वेळीच देशाच्या भल्यासाठी लॉकडाऊनसारखा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे आज करोनाचा संसर्ग कमी आहे’, असे सिमी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सिमी यांनी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि मुंबई पालिकेचीही कौतुक केले आहे.

 ‘पृथ्वीवर प्रति मिलियन हिशेबाने सर्वाधिक कमी संसर्ग. सर्व मुख्यमंत्र्यांनी यासाठी कठोर पाऊले उचलली. आपल्या मुंबई पालिकेनेही तत्परतेने काम केले. रस्ते स्वच्छ व सॅनिटाईज्ड आहेत,’ असे त्यांनी आपल्या दुस-या ट्विटमध्ये लिहिले.
याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक ट्विट केले. डॉक्टर, नर्स, पोलिस यांचेही त्यांनी आभार मानलेत.
 सिमी गरेवाल या एकेकाळच्या  बॉलिवूडच्या  बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात. त्यांचा जन्म दिल्लीत झाला. पण त्या लहानाच्या मोठ्या झाल्यात त्या इंग्लंडमध्ये. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांना ‘टार्जन गोज टू इंडिया’ हा सिनेमा आॅफर झाला. पहिल्याच चित्रपटात त्यांना फिरोज खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. पुढे राज कपूर, सत्यजीत रे, मृणाल सेन यासारख्या दिग्गजांसोबत सिमी यांनी अनेक चित्रपटांत काम केले.

Web Title: simi garewal tweet on covind 19 india says first credit goes to pm narendra modi-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.