सिद्धू मुसेवालाची आई गरोदर असल्याच्या चर्चांवर सिंगरच्या वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, "आमच्या कुटुंबाकडून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 10:40 AM2024-03-13T10:40:25+5:302024-03-13T10:40:50+5:30

Sidhu Moosewala Mother : गरोदर नाही सिद्धू मुसेवालाची आई? सिंगरच्या वडिलांची पोस्ट चर्चेत

sidhu moosewala father shared post amid singer mother charan kaur pregnancy rumors | सिद्धू मुसेवालाची आई गरोदर असल्याच्या चर्चांवर सिंगरच्या वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, "आमच्या कुटुंबाकडून..."

सिद्धू मुसेवालाची आई गरोदर असल्याच्या चर्चांवर सिंगरच्या वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, "आमच्या कुटुंबाकडून..."

दिवंगत पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. चरण कौर ५८व्या वर्षी जुळ्या बाळांना जन्म देणार असल्याचंही बोललं जात आहे. एकलुता एक मुलगा सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर त्यांनी आयव्हीएफ(IVF)च्या माध्यमातून पुन्हा आई होण्याचा निर्णय घेतला. या वयात आई होणार असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सिद्धू मुसेवालाच्या आईच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यानच आता गायकाच्या वडिलांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. 

सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी फेसबुकवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, "आमच्या कुटुंबाची काळजी असणाऱ्या सिद्धूच्या चाहत्यांचे आम्ही आभारी आहोत. पण, सध्या कुटुंबाबाबत अनेक अफवा पसरत आहेत. त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. आमच्या कुटुंबाकडून तुमच्याबरोबर योग्य ती माहिती शेअर केली जाईल". त्यांच्या या पोस्टमुळे खरंच सिद्धू मुसेवालाची आई गरोदर आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी चरण कौर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं वृत्त होतं. त्या जुळ्या मुलांना जन्म देऊ शकतात असं 'पंजाब केसरीने म्हटलं होतं. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून २९ मे २०२२ रोजी सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर आईवडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. 

Web Title: sidhu moosewala father shared post amid singer mother charan kaur pregnancy rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.