सिद्धार्थची सेटवर स्टंटबाजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 18:57 IST2017-01-07T18:57:11+5:302017-01-07T18:57:11+5:30

सिद्धार्थ सध्या सेटवर शूटिंगदरम्यान स्टंटबाजी करतो आहे. चित्रपटाचे कथानक हे अ‍ॅक्शन आधारित असल्याने सिद्धार्थ त्यांच्या स्टंटबाजीच्या स्किल्सवर विशेष मेहनत घेतो आहे.

Siddhartha sets stunts! | सिद्धार्थची सेटवर स्टंटबाजी!

सिद्धार्थची सेटवर स्टंटबाजी!

द्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांचं नातं काही मीडियापासून लपून राहिलेलं नाहीये. अलीकडेच त्यांचा ब्रेकअप झाला आणि दोघेही आपापल्या प्रोजेक्टसमध्ये बिझी झाले. ‘बार बार देखो’ चित्रपटात सिद्धार्थ  रोमँटिक अंदाजात दिसला. आता त्याच्या आगामी ‘रिलोडेड’ चित्रपटात अँग्री यंग मॅनच्या लूकमध्ये दिसणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ सध्या सेटवर शूटिंगदरम्यान स्टंटबाजी करतो आहे. चित्रपटाचे कथानक हे अ‍ॅक्शन आधारित असल्याने सिद्धार्थ त्यांच्या स्टंटबाजीच्या स्किल्सवर विशेष मेहनत घेतो आहे. 

‘स्टुडंट आॅफ द ईअर’ चित्रपटातून सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर त्याचा ‘एक विलेन’ हा चित्रपट चाहत्यांमध्ये बराच गाजला. मात्र, रोमँटिक चित्रपटांपेक्षा अ‍ॅक्शनपटात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सिद्धार्थ प्रयत्न करतोय. अक्षय कुमारसोबतचा ‘ब्रदर्स’ हा चित्रपटही त्याने केवळ स्टंटबाजी आणि अ‍ॅक्शन लूकसाठी केला होता. त्याचा आगामी ‘रिलोडेड’ चित्रपटात तो जॅकलिन फर्नांडिस आणि सुनील शेट्टीसोबत दिसणार आहे.








 

Web Title: Siddhartha sets stunts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.