सिद्धार्थ म्हणतो, माझा अभिनय राजेश खन्नाप्रमाणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 17:21 IST2016-06-18T11:51:53+5:302016-06-18T17:21:53+5:30

अभिनेता सिद्धार्थ याच्या अनुसार त्याचा इत्तेफाकमधील अभिनय राजेश खन्नाप्रमाणे झालाय. १९६९ साली राजेश खन्ना यांचा इत्तेफाक हा चित्रपट आला ...

Siddhartha says, like my acting Rajesh Khanna! | सिद्धार्थ म्हणतो, माझा अभिनय राजेश खन्नाप्रमाणे!

सिद्धार्थ म्हणतो, माझा अभिनय राजेश खन्नाप्रमाणे!

िनेता सिद्धार्थ याच्या अनुसार त्याचा इत्तेफाकमधील अभिनय राजेश खन्नाप्रमाणे झालाय. १९६९ साली राजेश खन्ना यांचा इत्तेफाक हा चित्रपट आला होता. त्याचाच हा रिमेक आहे.
‘इत्तेफाकसाठी मी खूपच उत्सुक आहे. पूर्वीच्या इत्तेफाकचा हा रिमेक आहे. सुपरस्टार राजेश खन्ना यांनी केलेला चित्रपट मी पुन्हा करीत आहे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या चित्रपटाचा रिमेक करताना त्यांच्यासारखाच अभिनय करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
सिद्धार्थने २०१२ साली स्टुडंट्स आॅफ  दि इअरच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. 
शाहरुख खानचा रेड चिली एंटरटेन्मेंट, करण जोहरचा धर्मा प्रॉडक्शन आणि बीआर फिल्म्स हे या चित्रपटाचे सहनिर्माता आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते. यामध्ये नंदा ही अभिनेत्री होती. 

Web Title: Siddhartha says, like my acting Rajesh Khanna!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.