सिद्धार्थ मल्होत्राने केले ह्या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 21:00 IST2018-12-07T21:00:00+5:302018-12-07T21:00:00+5:30
'एक व्हिलन' या चित्रपटात एकत्र झळकेली सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख ही जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकण्यास सज्ज झाली आहे.

सिद्धार्थ मल्होत्राने केले ह्या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात
'एक व्हिलन' या चित्रपटात एकत्र झळकेली सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख ही जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकण्यास सज्ज झाली आहे. दिग्दर्शक मिलाप झवेरी यांच्या आगामी 'मरजावां' या चित्रपटात ही जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे.
'मरजावां' चित्रपटाची टॅगलाईन 'इश्क में मरेंगे भी और मारेंगे भी' अशी असून या चित्रपटात राकुल प्रित, सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारीत असून यात अॅक्शन ड्रामा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ व रितेशसोबत अभिनेत्री तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सिद्धार्थ मल्होत्राने या सिनेमातील त्याचा लूक इंस्टाग्रामवर शेअर करीत चित्रीकरण सुरू केल्याची माहिती दिली आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे.
#Marjaavaan filming begins today... Directed by Milap Milan Zaveri... 2 Oct 2019 release. pic.twitter.com/aYGdgttqpH
— taran adarsh (@taran_adarsh) December 7, 2018
तारा सुतारिया ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सचे यूकेतून ट्रेनिंग घेतले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे.