श्वेता तिवारी सुंदर मुलगी बनणार दर्शील सफारीची हिरोईन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2017 16:04 IST2017-05-28T10:34:14+5:302017-05-28T16:04:14+5:30
छोट्या पडद्यावर आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक आता मोठी झालीय आणि बॉलिवूडमध्ये एन्ट्री ...
.jpg)
श्वेता तिवारी सुंदर मुलगी बनणार दर्शील सफारीची हिरोईन!
छ ट्या पडद्यावर आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक आता मोठी झालीय आणि बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यासाठी तयार आहे. होय, ऐकता ते खरे आहे. पलक बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. तेही ‘वन फिल्म, वन वंडर किड’ दर्शील सफारीसोबत. होय, दर्शील सफारी आता मोठ्या पडद्यावर लीडिंग मॅन बनणार आहे आणि पलक त्याची हिरोईन. ‘Quickie’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट दर्शीलने साईन केलाय आणि या चित्रपटासाठी फिमेल लीड म्हणून पलक तिवारीचे नाव निश्चित झाले आहे. हा चित्रपट एका लव्हस्टोरी असल्याचे कळतेय. अर्थात अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
![]()
दर्शील सफारी सर्वप्रथम २००७ मध्ये आमिर खानच्या ‘तारे जमीं पे’मध्ये बाल कलाकार म्हणून दिसला होता. यानंतर दुसºया काही चित्रपटांत तो बालकलाकार म्हणून झळकला. दर्शील आता २१ वर्षांचा झाला आहे.
![]()
े पलक ही श्वेता तिवारी आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. २००७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. यानंतर श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केले. या दोघांचा एक मुलगा आहे. कालच सोशल मीडियावर श्वेता तिवारीच्या मृत्यूची अफवा व्हायरल झाली होती. कुणीतरी साक्षी तंवरचे फेक अकाऊंट बनवून त्यावर श्वेताच्या मृत्यूची बातमी पोस्ट केली होती. श्वेताचा पती अभिनव याच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. ही बातमी त्याला कळली तेव्हा त्याने लगेच श्वेताला फोन केला. मी अगदी ठणठणीत असल्याचे श्वेताने त्याला सांगितले तेव्हा कुठे त्याचा जीव भांड्यात पडला.