Shubh Mangal Savdhaan trailer: आयुष्यमान खुराणा आहे ‘या’ पुरूषांच्या आजाराने ग्रस्त!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 15:50 IST2017-08-01T10:20:14+5:302017-08-01T15:50:14+5:30
आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. होय, आनंद एल राय यांच्या ‘शुभ मंगल ...

Shubh Mangal Savdhaan trailer: आयुष्यमान खुराणा आहे ‘या’ पुरूषांच्या आजाराने ग्रस्त!!
आ ुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. होय, आनंद एल राय यांच्या ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटात ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर आज रिलीज झाले आणि पाठोपाठ चित्रपटाचा ट्रेलरही आऊट झाला.
![]()
ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पोस्टरमध्ये भूमी ताजमहालच्या समोर बसलेली आहे आणि आयुष्यमान तिच्या मांडीवर ठोके ठेवून पहुडलेला दिसतोय. चित्रपटाचा ट्रेलरही प्रचंड विनोदी आहे. होणाºया सासरेबुवासोबत डॉक्टरपुढे आपली एक ‘अडचण’ घेऊन बसलेला आयुष्यमान आणि पुढे या ‘अडचणी’वरचे द्विअर्थी संवाद भन्नाट आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातील एक ‘नॉन कुल’ मुदित आणि ‘नॉन हॉट’ सुगंधा यांचे प्रेम आणि त्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर आपण बघायलाच हवा. या रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर आयुषमान आणि भूमीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलाय. ‘सुगंधा, सबको पता चल गयी है अपनी स्टोरी,’ असे कॅप्शन आयुषमानने दिलेय. तर भूमीनेही, ‘मै और मुदित आ गए है इस शुभ घडी मे, सब सावधान रहना, बहुत ही मंगल होने वाला है,’ असे कॅप्शन देत ट्रेलर पोस्ट केलाय.
चित्रपटात भूमी सुगंधा नामक मुलीची भूमिका साकारतेय तर आयुष्यमान मुदित नामक पात्र रंगवतोय. हा चित्रप्ट तामिळ चित्रपट ‘कल्याना समयल साधम’चा हिंदी रिमेक आहे. यापूर्वी आलेला चित्रपटाचा टीजर लोकांना प्रचंड आवडला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला, ते नक्की कळवा.