श्रुतीने दिला ‘रांझा रांझा’ गाण्याला नवा तडका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 11:44 IST2017-01-15T11:44:41+5:302017-01-15T11:44:41+5:30

ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरलेला ‘रावन’ चित्रपट आठवतोय का? ज्यामध्ये हे पती-पत्नी एकत्र ...

Shruti gave new song 'Ranjha Ranjha' | श्रुतीने दिला ‘रांझा रांझा’ गाण्याला नवा तडका!

श्रुतीने दिला ‘रांझा रांझा’ गाण्याला नवा तडका!

्वर्या रॉय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरलेला ‘रावन’ चित्रपट आठवतोय का? ज्यामध्ये हे पती-पत्नी एकत्र दिसले होते. बॉक्स आॅफिसवर जरी हा चित्रपट फ्लॉप झाला असला तरीही चित्रपटातील या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली तसेच चित्रपटातील संगीत आणि गाणी ही विशेषत्वाने पसंत केली गेली. त्यातलं चाहत्यांनी पसंत केलेलं एक गाणं म्हणजे ‘रांझा रांझा’. आता या गाण्याला नव्या आवाजाची जोड मिळणार आहे. हा आवाज म्हणजे अभिनेत्री श्रुती हसनचा. मुळ गायिका रेखा भारद्वाज यांच्या आवाजातील हे गाणं आता संगीतकार ए.आर. रहमान यांच्या साथीनं अभिनेत्री श्रुती हसन हिने नव्या अंदाजात गायले.

                               

‘फिर ले आया दिल’,‘तेरे ईश्क मैं’,‘तेरी फरियाद’ यासारखी गाणी गायिका रेखा भारद्वाज यांनी गायली. त्यांच्या गायकीतील विश्वास, दमदार आवाज असूनही त्यांनी बोटावर मोजता येणाऱ्या गाण्यांना त्यांनी आवाज दिला. त्यामुळे त्यांच्या गाण्यांची चर्चा बॉलिवूडमधील सध्याच्या ट्रेंडिंग गाण्यांपैकी एक अशी केली जाते. एवढ्या मोठ्या आणि अनुभवसंपन्न अशा गायिकेचे एक गाणे श्रुती हसन हिला गायला मिळाले. ‘एका वाहिनीवरील एका कार्यक्रमात श्रुतीला गायिका रेखा भारद्वाज यांचे गाणे गायला मिळणार असे कळाल्यावर ती म्हणाली,‘ऐश्वर्या रॉय यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे मला गायला मिळणार असल्याने मी बेहद खुश आहे. नवीन काहीतरी शिकवणारा हा माझा अनुभव ठरणार आहे. ‘रांझा रांझा’ हे गाणं अनप्लग्डच्या स्वरूपात म्हणणं हा माझ्यासाठी खरंच खुप वेगळा अनुभव असेल. लाईव्ह आॅर्के स्ट्रासोबत गाणं सादर करणं हे माझ्यासाठी खुप महत्त्वाचं आहे.’ 

ए.आर.रहमान यांनी अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘ओके जानू’ चित्रपटात ‘एन्ना सोना’ या गाण्यासाठी संगीत दिले आहे. तसेच ‘मन चांद रे’,‘ऐसे ना देखो’,‘तु हैं’ या मोहेंजोदडो चित्रपटातील गाण्यांनाही संगीत देऊन त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. 

Web Title: Shruti gave new song 'Ranjha Ranjha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.