'और पुष्पा कभी झुकेगा नही साला…' म्हणत श्रेयस तळपदेनं अल्लू अर्जुनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 01:59 PM2023-04-08T13:59:59+5:302023-04-08T14:00:42+5:30

Allu Arjun And Shreyas Talpade : अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी ‘पुष्पा २’चा टीझर शेअर करत अभिनेता श्रेयस तळपदेने स्पेशल पोस्ट लिहिली आहे.

Shreyas Talpade wished Allu Arjun on his birthday by saying 'Aur Pushpa Kabhi Zukega Nahi Sala...' | 'और पुष्पा कभी झुकेगा नही साला…' म्हणत श्रेयस तळपदेनं अल्लू अर्जुनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

'और पुष्पा कभी झुकेगा नही साला…' म्हणत श्रेयस तळपदेनं अल्लू अर्जुनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

googlenewsNext

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर फिल्म 'पुष्पा २' (Pushpa 2)ची वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर फिल्म पुष्पा २चा पहिला टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये दिग्दर्शक सुकुमार यांनी पुष्पराजची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. या टीझरला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळतो आहे. आता आज अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी ‘पुष्पा २’चा टीझर शेअर करत अभिनेता श्रेयस तळपदेने स्पेशल पोस्ट लिहिली आहे.

श्रेयस तळपदे याने ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनने साकारलेल्या पुष्पा या पात्राला हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला होता. श्रेयस तळपदेने केलेल्या या कामाची खूप प्रशंसा झाली होती. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्येही पुष्पा या भूमिकेसाठी आपल्याला श्रेयस तळपदेचा आवाज ऐकू येणार आहे. आज अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त श्रेयसने हा टीझर शेअर करत त्याचा या चित्रपटासाठी डबिंग करण्याचा अनुभव शेअर केला.


हा टीझर शेअर करत श्रेयसने लिहिले की, ''अब रुल पुष्पा का… और पुष्पा कभी झुकेगा नही साला… अल्लू अर्जुनजी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा दिवस आणि येणारी सगळी वर्ष या टीझरसारखीच जबरदस्त जावो. एक दिवस मी ती शेवटची ओळ डब करण्यासाठी गेलो आणि पुन्हा सर्व आठवणी माझ्या मनात जाग्या झाल्या. काय सुरेख अनुभव होता तो!'' श्रेयस तळपदेची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.  त्याचे चाहते ‘पुष्पा २’बद्दल खूप उत्सुक आहेत.

Web Title: Shreyas Talpade wished Allu Arjun on his birthday by saying 'Aur Pushpa Kabhi Zukega Nahi Sala...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.