श्रेयस तळपदे ‘या’ खानवर भडकला; म्हटले ‘औकातमध्ये रहा, जय महाराष्ट्र!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 20:10 IST2017-09-09T14:40:41+5:302017-09-09T20:10:41+5:30

शुक्रवारी ‘पोस्टर बॉयज’ हा मल्टीस्टारर चित्रपट रिलीज झाला. पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला, शिवाय समीक्षकांनीही चित्रपटाचे बºयापैकी ...

Shreyas Talpade or 'Khanwar Bhadkala; "Stay in a house, Jai Maharashtra!" | श्रेयस तळपदे ‘या’ खानवर भडकला; म्हटले ‘औकातमध्ये रहा, जय महाराष्ट्र!’

श्रेयस तळपदे ‘या’ खानवर भडकला; म्हटले ‘औकातमध्ये रहा, जय महाराष्ट्र!’

क्रवारी ‘पोस्टर बॉयज’ हा मल्टीस्टारर चित्रपट रिलीज झाला. पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला, शिवाय समीक्षकांनीही चित्रपटाचे बºयापैकी कौतुक केले. परंतु स्वत:ला सर्वात मोठा क्रिटिक्स समजणाºया केआरकेला मात्र हा चित्रपट फारसा भावला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने नेहमीप्रमाणे चित्रपटावर टीका केली. परंतु त्याची ही टीका अभिनेता तथा दिग्दर्शक श्रेयश तळपदेला फारशी भावली नाही. त्याने ट्विटरवरच केआरकेला खडेबोल सुनावत ‘औकात’मध्ये राहण्याचा सल्ला दिला. 

वास्तविक स्वयंघोषित कमाल राशिद खान ऊर्फ केआरके हा सर्वच चित्रपटांवर टीका करीत असतो. ट्विटच्या माध्यमातून त्याचा नेहमीच टिवटिवाट असतो. यावेळेसही त्याने असेच काहीसे केले. ट्विट करताना त्याने लिहिले की, ‘टॉप क्लास फालतू चित्रपट असलेल्या ‘पोस्टर बॉयज’ने पहिल्या दिवशी एक कोटी ८० लाख रुपयांची कमाई करून सनी देओलचे शून्य स्टारडम असल्याचे दाखवून दिले. तसेच श्रेयश तळपदे किती खराब दिग्दर्शक आहे हेदेखील सिद्ध केले.’ जेव्हा हे ट्विट श्रेयसने वाचले तेव्हा त्याने केआरकेला चांगलेच खडेबोल सुनावले. 



श्रेयसने केआरकेच्या ट्विटला रिट्विट करताना लिहिले की, ‘औकातमध्ये रहा कमाल राशिद खान... कधी सापडलास ना तर एवढ्या जोरात पटकणार की टप्पा खाऊन छताला लागशील... जय  महाराष्ट्र!’ एवढेच नाही तर केआरकेच्या या ट्विटला सनी देओलच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात रिप्लाय देत त्याला खडेबोल सुनावले. काहींनी तर त्याला अतिशय अश्लील भाषेत रिट्विट केले. युजर्सने म्हटले की, ‘केआरके यावेळेस तू चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला आहे. कारण सनी देओल तुझा बाप आहे तर श्रेयस तुझा काका’

एवढा पंचनामा होऊनदेखील केआरके थांबला नाही. त्याने श्रेयसच्या ट्विटचा स्क्रिनशॉट घेऊन त्यावर ट्विट केले. ज्यामध्ये लिहिले की, ‘पहलवान, मी तर तुझ्या चित्रपटाच्या शोच्या ठिकाणी भेटलो होतो. मात्र, तू काहीच बोलला नाहीस. पुढच्या वेळेस पॅण्ट ओली होण्याअगोदर बोलण्याची हिम्मत ठेव.’ आता या दोघांमधील वाद कुठवर पेटणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. असो, चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास, श्रेयसने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावले आहे. शिवाय सनी आणि बॉबीची भूमिका पाहता चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगले प्रदर्शन करण्याची अपेक्षा आहे. 

Web Title: Shreyas Talpade or 'Khanwar Bhadkala; "Stay in a house, Jai Maharashtra!"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.