"आत्माजी, दर्शन दो", श्रेयस तळपदेच्या नव्या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित; तुषार कपूरही दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 12:15 PM2024-03-21T12:15:15+5:302024-03-21T12:15:39+5:30

श्रेयसच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली आहे. 'कपकपी' या बॉलिवूड सिनेमातून पुन्हा एकदा श्रेयस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

shreyas talpade new horror comedy movie kapakapi motion poster released tushar kapoor play important role | "आत्माजी, दर्शन दो", श्रेयस तळपदेच्या नव्या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित; तुषार कपूरही दिसणार मुख्य भूमिकेत

"आत्माजी, दर्शन दो", श्रेयस तळपदेच्या नव्या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित; तुषार कपूरही दिसणार मुख्य भूमिकेत

राठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टी गाजवणारा गुणी अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून श्रेयसने त्याचा ठसा उमटवला. काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने श्रेयसच्या चाहत्यांना चिंता सतावत होती. पण, यातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर आता श्रेयस पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

अलिकडेच श्रेयसचा 'ही अनोखी गाठ' सिनेमा प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर आता श्रेयसच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली आहे. 'कपकपी' या बॉलिवूड सिनेमातून पुन्हा एकदा श्रेयस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा असून याचं पहिलं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये श्रेयस तळपदेबरोबर अन्य काही जण प्लानचेट करताना दिसत आहेत. तर खिडकीत एक सावली असल्याचं पाहायला मिळत आहे. 

श्रेयस तळपदेच्या या 'कपकपी' सिनेमात अभिनेता तुषार कपूरही झळकणार आहे. सिद्धी इंदानी, अभिषेक कुमार, जय ठक्कर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन संगीत शिवन यांनी केलं आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, श्रेयस तळपदे सध्या 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. 

Web Title: shreyas talpade new horror comedy movie kapakapi motion poster released tushar kapoor play important role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.