पियु बोले...! प्रेग्नंट चाहतीच्या बेबी बंपवर हात ठेवून श्रेयाने गायलं गाणं, पोटातील बाळानेही दिला प्रतिसाद, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:19 IST2025-07-09T13:18:52+5:302025-07-09T13:19:24+5:30
श्रेयाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. सिंगरचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. आणि तिच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

पियु बोले...! प्रेग्नंट चाहतीच्या बेबी बंपवर हात ठेवून श्रेयाने गायलं गाणं, पोटातील बाळानेही दिला प्रतिसाद, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडची लोकप्रिय सिंगर श्रेया घोषाल तिच्या सुमधूर आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करते. आवाजाने चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या श्रेयाने सध्या तिच्या कृतीनेही मनं जिंकलीत आहेत. श्रेयाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. सिंगरचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. आणि तिच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रेयाने तिच्या एका प्रेग्नंट चाहतीची इच्छा पूर्ण केली आहे. याचा व्हिडिओ समोर आली आहे. या व्हिडिओत श्रेया गरोदर चाहतीच्या बेबी बंपवर हात ठेवून बाळाला तिच्या सुमधूर आवाजात गाणं ऐकवून दाखवत असल्याचं दिसत आहे. 'पियु बोले' हे गाणं श्रेया गाताना दिसत आहे. तिच्या आवाजाला चाहतीच्या पोटातील बाळही प्रतिसाद देत असल्याचं श्रेयाच्या हावभावावरुन कळत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते खूश झाले आहेत. आणि श्रेयाच्या या चांगुलपणाचं कौतुकही करत आहे.
श्रेयाचा हा व्हिडिओ वरिंदर चावला या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. श्रेया अॅम्स्टाडार्म येथे ऑल हार्टस मध्ये परफॉर्म करण्यासाठी गेली होती. तिथे बॅकस्टेजला ही गरोदर चाहती तिला भेटायली आली आणि तिने तिची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर श्रेयाने कोणतीही आडीकाठी न घेता चाहतीची ही इच्छा पूर्ण केली.