लवकरच आई होणार आहे सिंगर श्रेया घोषाल, बेबी बॅम्प फ्लॉन्ट करत चाहत्यांना दिली गुड न्यूज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 11:28 IST2021-03-04T11:22:04+5:302021-03-04T11:28:06+5:30
Singer Shreya Ghoshal announces her pregnancy on social media : श्रेया घोषालने तिच्या प्रेग्नेंसीची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

लवकरच आई होणार आहे सिंगर श्रेया घोषाल, बेबी बॅम्प फ्लॉन्ट करत चाहत्यांना दिली गुड न्यूज !
श्रेया घोषालने तिच्या प्रेग्नन्सीची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. बेबी बॅम्प फ्लॉन्ट करतानाचा फोटो पोस्ट करत लोकांना प्रेम आणि आशीर्वाद देण्याची विनंती केली आहे.
श्रेया घोषाल लवकरच आई होणार आहे आणि तिने बेबी बॅम्पसोबता तिचा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. या फोटोत श्रेयाने आपले दोनही हात बेबी बॅम्पवर ठेवले आहेत.
'बेबी श्रेयादित्य येणार आहे! शिलादित्य मुखोपाध्याय आणि मला ही बातमी तुम्हाला सांगताना आनंद होतो आहे. आपल्या प्रेम आणि आशीर्वादांची आवश्यकता आहे, कारण आम्ही आमच्या जीवनात या नवीन अध्यायसाठी स्वतःला तयार केले आहे. ' श्रेयाने ही आनंदाची बातमी शेअर करताच तिच्या चाहत्यांनी आणि मित्रपरिवारांने तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.
5 फेब्रुवारी 2015 रोजी पार्श्वगायिका श्रेया घोषालने तिचे बालपणीता मित्र शिलादित्यशी लग्न केले. श्रेया आणि शिलादित्य हे बालपण मित्र होते. शिलादित्य Hipcask.com वेबसाइटचे संस्थापक आहेत. श्रेयाने २००२ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटातून पार्श्वगायनाच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिने 'सिलसिला ये चाहत का', 'बॅरी पिया', 'छलक छलक', 'मोरे पिया' आणि 'डोला रे डोला' अशी पाच गाणी गायली. यानंतर, तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.