क्रिती सॅनन पडली श्रद्धा कपूरवर भारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2017 14:47 IST2017-07-23T09:17:12+5:302017-07-23T14:47:12+5:30
येत्या १८ आॅगस्टला बॉक्सआॅफिसवर दोन चित्रपटांचा संघर्ष रंगणार आहे आणि या निमित्ताने दोन अभिनेत्रीही आमने-सामने येणार आहेत. होय,‘हसीना पारकर’ ...

क्रिती सॅनन पडली श्रद्धा कपूरवर भारी!
य त्या १८ आॅगस्टला बॉक्सआॅफिसवर दोन चित्रपटांचा संघर्ष रंगणार आहे आणि या निमित्ताने दोन अभिनेत्रीही आमने-सामने येणार आहेत. होय,‘हसीना पारकर’ आणि ‘बरेली की बर्फी’ असे दोन चित्रपट येत्या १८ आॅगस्टला रिलीज होत आहेत. ‘हसीना पारकर’मध्ये श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये आहे तर ‘बरेली की बर्फी’मध्ये क्रिती सॅनन. दोन्ही चित्रपटांचा बाज वेगवेगळा आहे. त्यामुळे बॉक्सआॅफिसवर या चित्रपटांचे भविष्य कसे असेल ते आत्ताच सांगता येणार नाही. पण सध्याचे म्हणाल तर, क्रिती सॅननच्या ‘बरेली की बर्फी’चे पारडे श्रद्धाच्या ‘हसीना पारकर’पेक्षा जड दिसतेय. होय, रिलीजआधी यू-ट्यूबवर या दोन्ही चित्रपटांची काट्याची लढत बघायला मिळते आहे. पण याठिकाणी ‘हसीना पारकर’च्या तुलनेत ‘बरेली की बर्फी’ची धूम आहे. श्रद्धाच्या ‘हसीना पारकर’चा ट्रेलर गत १८ जुलैला रिलीज झाला होता. हा ट्रेलर लोकांना भलताच आवडला होता.
रिलीजच्या पाच दिवसांत हा ट्रेलर सुमारे ६० लाख लोकांनी पाहिला. यानंतर एका दिवसांनी ‘बरेली की बर्फी’चा ट्रेलर रिलीज झाला. पण ‘बरेली की बर्फी’ म्हणाल तर पाच दिवसांत ६३ लाख लोकांनी तो पाहिलाय. एवढेच नाही तर लाईक आणि डिसलाईकच्या बाबतीतही ‘बरेली की बर्फी’चे पारडे जड आहे. ‘हसीना पारकर’ला १० हजार लोकांनी नापसंद केले आहे. याऊलट ‘बरेली की बर्फी’ला केवळ ३ हजारांच्या जवळपास लोकांनी नापसंद केले. एकंदर काय तर यू ट्युबवर तरी श्रद्धा कपूरपेक्षा क्रिती सॅनन भाव खावून गेली आहे. त्यामुळे बॉक्सआॅफिसवरचा निकाल पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बघूयात, बॉक्सआॅफिसवर कोण सरस ठरतं ते, श्रद्धा की क्रिती?