आपल्या फिल्मी करिअरविषयी ‘ही’ गोष्ट ऐकताच चकीत झाली श्रीदेवी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 14:08 IST2017-07-01T08:38:15+5:302017-07-01T14:08:15+5:30

कधी ‘हवा-हवाई’, तर कधी ‘चॉँदनी’ बनून कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी पुन्हा एकदा ‘मॉम’ बनून प्रेक्षकांना आपल्या ...

Shree Devi was shocked when he heard the story about this film career. | आपल्या फिल्मी करिअरविषयी ‘ही’ गोष्ट ऐकताच चकीत झाली श्रीदेवी!!

आपल्या फिल्मी करिअरविषयी ‘ही’ गोष्ट ऐकताच चकीत झाली श्रीदेवी!!

ी ‘हवा-हवाई’, तर कधी ‘चॉँदनी’ बनून कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी पुन्हा एकदा ‘मॉम’ बनून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची जादू दाखविणार आहे. होय, श्रीदेवीचा ‘मॉम’ हा चित्रपट येत्या ७ जुलै रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट श्रीदेवीसाठी खूपच स्पेशल आहे, कारण तिच्या चित्रपट करिअरमधील हा ३००वा चित्रपट आहे. या चित्रपटाचे स्पेशल असण्याचे आणखी एक कारण म्हणजे चित्रपटाचे निर्माता श्रीदेवीचे पती बोनी कपूर आहेत. असो, काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाची संपूर्ण कास्ट दिल्ली येथे पोहोचली होती. मात्र याठिकाणी असे काही घडले ज्यामुळे श्रीदेवी दंग राहिली. 

वास्तविक प्रमोशननिमित्त एका प्रेस कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीदेवीला काही प्रश्न विचारण्यात आले. त्यातील एक प्रश्न असा होता ज्यामुळे श्रीदेवी चकीत झाली. श्रीदेवीला विचारण्यात आले की, ‘तुझा आगामी ‘मॉम’ हा चित्रपट ३००वा आहे, अशात तुला कसे वाटत आहे?’ हा प्रश्न ऐकून श्रीदेवी चकीत झाली. श्रीदेवीने म्हटले, ‘काय सांगत आहात? खरच हा माझा ३००वा चित्रपट आहे? प्लीज आता असं म्हणू नका की, मला इंडस्ट्रीत पन्नास वर्ष झाले आहे.’

‘मॉम’मध्ये श्रीदेवी व्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना आणि सजल अली यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रवि उद्यवर यांनी केले आहे. चित्रपटाची कथा एक आई आणि तिची सावत्र मुलगी हिच्या अवती-भोवती फिरते. सावत्र आईच्या भूमिकेत देवकी म्हणजेच श्रीदेवी असणार आहे. आपल्या मुलीला जगातील प्रत्येक सुख आणि आनंद देता यावा याकरिता देवकीची धडपड असते. मात्र मुलगी तिला आईच्या रूपात कधीच स्वीकारत नाही. अशात आईची ममता यशस्वी ठरेल? की त्यांच्या आयुष्यात काही तरी वादळ येईल? अशीच काहीसी चित्रपटाची कथा आहे. 

Web Title: Shree Devi was shocked when he heard the story about this film career.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.