सर्वसामान्याला घर खरेदी करता येईल ऐवढ्या किमतीची पर्स घेऊन इव्हेंटमध्ये पोहोचली श्रीदेवी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 21:31 IST2017-09-30T16:01:56+5:302017-09-30T21:31:56+5:30

अभिनेत्री श्रीदेवी ही नेहमीच तिच्या स्टाइल आणि लूकमुळे चर्चेत असते. नुकतीच श्रीदेवी सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टी हिने आयोजित ...

Shree Devi reached the event by purchasing a purse purse from the common man. | सर्वसामान्याला घर खरेदी करता येईल ऐवढ्या किमतीची पर्स घेऊन इव्हेंटमध्ये पोहोचली श्रीदेवी!

सर्वसामान्याला घर खरेदी करता येईल ऐवढ्या किमतीची पर्स घेऊन इव्हेंटमध्ये पोहोचली श्रीदेवी!

िनेत्री श्रीदेवी ही नेहमीच तिच्या स्टाइल आणि लूकमुळे चर्चेत असते. नुकतीच श्रीदेवी सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टी हिने आयोजित केलेल्या एका चॅरिटी प्रदर्शनात पोहोचली होती. इव्हेंटमध्ये पोहोचलेली श्रीदेवी खूपच सुंदर दिसत होती. मात्र ती तिच्या लूकपेक्षा तिच्याकडे असलेल्या पर्समुळेच अधिक चर्चेत राहिली. कारण तिच्याकडे असलेली पर्स ही लाखमोलाची होती. या पर्सची किंमत ऐकाल तर तुम्हाला कदाचित चक्कर येईल. कारण या पर्सच्या किमतीने एखाद्या सर्वसामान्याला घर खरेदी करता येईल. होय, या पर्सची किंमत आठ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. 



आकाराने लहान असलेल्या या पर्सचे मूल्य कदाचित कोणाच्या लक्षात येणार नाही, परंतु ही पर्स लाख मोलाची आहे. आठ लाख ही किंमत खूप मोठी असून, एखाद्या सर्वसामान्याला या किमतीत एखाद्या शहरात छोटेखानी घर घरेदी करता येईल. ही पर्स हेर्मेस बिर्किन ब्रॅण्डची आहे. या पर्सचे नाव हॉलिवूड अभिनेत्री जेन बिर्किन हिच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. 



या पर्सचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे ही पर्स जगातील सर्वांत महागड्या लेदरपासून बनविण्यात आली आहे. या लेदरला आॅस्ट्रिच लेदर असे म्हटले जाते. यामुळेच या पर्सची किंमत सर्वाधिक असते. त्याचबरोबर या पर्सच्या हॅण्डलवर गोल्ड पॉलिश करण्यात आलेली आहे. 



असो, श्रीदेवीच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास, तिने बºयाच कालावधीनंतर २०१२ मध्ये ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून सिल्वर स्क्रीनवर कमबॅक केले. त्यानंतर ती ‘मॉम’ या चित्रपटात बघावयास मिळाली. आता तिची मुलगी जान्हवी कपूरही लवकरच बॉलिवूड डेब्यू करण्याची शक्यता आहे. 

Web Title: Shree Devi reached the event by purchasing a purse purse from the common man.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.