श्रद्धा कपूरच्या या चित्रपटाचा होणार या तारखेला प्रीमिअर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 11:34 IST2018-04-05T06:04:03+5:302018-04-05T11:34:03+5:30

हसिना पारकर या चित्रपटात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांच्या अनुपस्थितीत भारतातील त्याचे काळे धंदे सांभाळणारी त्याची बहीण (दिवंगत) हसिना ...

Shraddha Kapoor's film will premiere on this date! | श्रद्धा कपूरच्या या चित्रपटाचा होणार या तारखेला प्रीमिअर!

श्रद्धा कपूरच्या या चित्रपटाचा होणार या तारखेला प्रीमिअर!

िना पारकर या चित्रपटात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांच्या अनुपस्थितीत भारतातील त्याचे काळे धंदे सांभाळणारी त्याची बहीण (दिवंगत) हसिना पारकर हिच्या जीवनाची झलक सादर करण्यात आली आहे.हसिनाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आणि दाऊदचा माफिया व्यवसाय ती कसा सांभाळत गेली, हे दाखवून देण्यासाठी चित्रपटात फ्लॅशबॅक तंत्राचा वापर करण्यात आला आहे.अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटात श्रध्दा कपूर ही हसिनाच्या भूमिकेत असून तिचा भाऊ सिध्दांत कपूर याने दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली असून अंकुर भाटियाने हसिनाचा पती इब्राहिम पारकरची भूमिका साकारली आहे.‘नए इंडिया का ब्लॉकबस्टर चॅनल’ असलेल्या ‘अ‍ॅण्ड पिक्चर्स’वर शुक्रवार, 6 एप्रिल रोजी रात्री 8.00 वाजता श्रध्दा कपूर अभिनित ‘हसिना पारकर’ हा चित्रपट प्रसारित केला जाणार आहे.हसिनाचा भाऊ दाऊद गुन्हेगारी विश्वात जसजसा वरच्या स्तरावर जातो, तसतसे त्याचे शत्रूही मोठ्या प्रमाणावर वाढतात.गुन्हेगारी जगतातील दाऊदचा दरारा कमी करण्यासाठी त्याचा शत्रू त्याच्या बहिणीच्या पतीची इब्राहिम पारकरची हत्या करतो. 1993 मधील मुंबईत घडविलेल्या बॉम्बस्फोट मालिकेचे पडसाद देशातच नव्हे,तर जगभरात उठतात. या स्फोटांमागे हसिनाचा भाऊ दाऊदच असल्याचा ठपका ठेवला जातो.परंतु दाऊद दुबईला पळून जातो आणि  इकडे हसिना पोलिसांच्या चौकशीच्या चक्रात सापडते. पण याच काळात तिला जाणवते की तिला आता या विश्वापासून फार काळ दूर राहता येणार नाही आणि तेव्हा ती दाऊदच्या अनुपस्थितीत भारतातील त्याच्या टोळीची सूत्रे हाती घेते आणि त्याच्या टोळीची ‘आपा’ (मोठी बहीण) बनते.दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीशी संबंधित 88 गुन्ह्यांच्या खटल्यांना तोंड देण्यासाठी हसिना पारकरला (श्रध्दा कपूर) वारंवार न्यायालयात खेटे घालावे लागतात.परंतु खंडणी वसुलीच्या धंद्याशी आपला काही संबंध नसल्याचा दावा करीत हसिना आपली जीवनकथा उघड करते- एका पोलिस हवालदाराच्या अनेक मुलांपैकी एक असलेली,लहानपणीच विवाह लावण्यात आलेली आणि अकाली विधवा झालेली मध्यमवयीन महिला, एक आजी आणि एक गॉडमदर आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील एक साक्षीदार.हसिना पारकरची ही गुंतवून ठेवणारी जीवनकहाणी आता छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे.

Web Title: Shraddha Kapoor's film will premiere on this date!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.