‘साहो’ आणि ‘सायना’च्या शूटिंगला सुरुवात करण्याअगोदर श्रद्धा कपूरने केले मोठे वक्तव्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 21:12 IST2017-09-10T15:42:18+5:302017-09-10T21:12:18+5:30

‘साहो’ आणि ‘सायना’ या दोन मोठ्या प्रोजेक्टमुळे  अभिनेत्री श्रद्धा कपूर भलतीच चर्चेत आहे. या चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात करण्याअगोदरच श्रद्धाने ...

Shraddha Kapoor made a big statement before shooting 'Saoho' and 'Saina' | ‘साहो’ आणि ‘सायना’च्या शूटिंगला सुरुवात करण्याअगोदर श्रद्धा कपूरने केले मोठे वक्तव्य!

‘साहो’ आणि ‘सायना’च्या शूटिंगला सुरुवात करण्याअगोदर श्रद्धा कपूरने केले मोठे वक्तव्य!

ाहो’ आणि ‘सायना’ या दोन मोठ्या प्रोजेक्टमुळे  अभिनेत्री श्रद्धा कपूर भलतीच चर्चेत आहे. या चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात करण्याअगोदरच श्रद्धाने मोठे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. श्रद्धाचे म्हणणे आहे की, ‘कुठल्याही चित्रपटाकडे मी आव्हान म्हणून बघत नाही, तर या आव्हानामुळेच मी माझ्या कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहे.’ सध्या श्रद्धा तिच्या आगामी ‘हसीना पारकर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

‘रोमॅण्टिक आणि भावनात्मक चित्रपटांपैकी तुला कोणत्या चित्रपटात काम करायला आवडेल?’ असे जेव्हा श्रद्धाला विचारण्यात आले, तेव्हा तिने म्हटले की, ‘प्रत्येक चित्रपट माझ्यासाठी आव्हान आहे. कारण लव्हस्टोरीवर किंवा भावनात्मक चित्रपट करणे अधिक अवघड आहे असे मी म्हणू शकत नाही. मला असे वाटते की, अशा चित्रपटांमध्ये काम करताना मी किती चांगल्या पद्धतीने काम करू शकते किंवा माझ्या कामात मी किती सुधारणा करू शकते, हे माझ्या दृष्टीने आव्हानात्मक आहे.’

‘हसीना पारकर’ या चित्रपटानंतर श्रद्धा भारतीय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिच्यावर आधारित बायोपिकमध्ये सायनाची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर ती ‘बाहुबली’ प्रभासच्या आगामी ‘साहो’मध्येही बघावयास मिळणार आहे. या दोन्ही चित्रपटांविषयी श्रद्धाने म्हटले की, ‘मी अजूनपर्यंत ‘साइना’च्या शूटिंगला सुरुवात केली नाही. कारण सध्या मी या चित्रपटांच्या भूमिकेसाठी तयारी करीत आहे.’ तसेच श्रद्धाने हेदेखील स्पष्ट केले की, ती लवकरच ‘साहो’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाची शूटिंग हिंदी आणि तेलगूमध्ये असणार आहे. 

दरम्यान, ‘हसीना पारकर’ या चित्रपटात श्रद्धा भाऊ सिद्धांत कपूरसोबत बघावयास मिळणार आहे. तिने या चित्रपटाच्या अनुभवाविषयी सांगताना, अविस्मरणीय असे म्हटले आहे. ‘मला विश्वासच बसत नाही की, मी माझ्या भावासोबत काम केले आहे.’ हा चित्रपट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्यावर आधारित आहे. चित्रपटात श्रद्धाने हसीना पारकरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात श्रद्धा खूपच दमदार भूमिकेत बघावयास मिळत आहे. 

Web Title: Shraddha Kapoor made a big statement before shooting 'Saoho' and 'Saina'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.