लग्न करतोय श्रद्धा कपूरचा भाऊ, जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी वधू

By गीतांजली | Updated: December 8, 2020 14:00 IST2020-12-08T14:00:00+5:302020-12-08T14:00:02+5:30

प्रियांकचा डेब्यू सिनेमा 'सब कुशल मंगल' हा यावर्षीच रिलीज झाला होता.

Shraddha kapoor cousin priyank sharma marriage soon | लग्न करतोय श्रद्धा कपूरचा भाऊ, जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी वधू

लग्न करतोय श्रद्धा कपूरचा भाऊ, जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी वधू

प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा आणि श्रद्धा कपूर हिचा मावस भाऊ प्रियांक शर्मा बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माता करीम मोरानी यांची मुलगी शाजा मोरानीशी लग्न करणार आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार  प्रियांक आणि शाजाच्या कुटुंबीयांनी लग्नाबद्दल जवळजवळ सर्वकाही निश्चित केले आहे. असे म्हटले जाते की 8 डिसेंबरला  प्रियांका आणि शाजा कोर्टात लग्न करणार आहेत.

 


करीम मोरानीच्या कर्मचार्‍यांनी सांगितले आहे की, मंगळवारी 8 डिसेंबरला  शगुनचे फंक्शन आहे आणि प्रियांक शाजाचा ऑफिशली प्रपोज करणार आहे.  याबाबत करीम मोरानी म्हणाली, "हो, शाजा आणि प्रियांक लग्न करणार आहेत पण हे लग्न जानेवारी किंवा फेब्रुवारीत होईल." प्रियांक आणि शाजा 2018 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. शाजा तिच्या होणाऱ्या सासूबाई पद्मिनी कोल्हापुरे यांच्या खूप क्लोज आहे.


प्रियांकचा डेब्यू सिनेमा 'सब कुशल मंगल' हा यावर्षीच रिलीज झाला होता. ज्यामध्ये रवी किशनची मुलगी रीवानाने पदार्पण केले.  शाजाने  'ऑलवेज कभी कभी' आणि  'हॅपी न्यू इयर'सारख्या सिनेमांसाठी असिस्टेंट डारेक्टर म्हणून काम केले आहे. या वर्षाच्या सुरूवातीस शाजा, तिची बहीण जोआ आणि वडील करीम मोरानी यांना कोरोना झाला होता  आणि त्यांना कित्येक दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

Web Title: Shraddha kapoor cousin priyank sharma marriage soon