‘शुभमंगल सावधान’ची शूटिंग संपली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 20:36 IST2017-04-28T14:43:39+5:302017-04-28T20:36:22+5:30

अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडनेकर यांच्या आगामी ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. आयुष्यमानने शुक्रवारी ट्विट ...

Shooting of Shubhamangal carefulness is over !! | ‘शुभमंगल सावधान’ची शूटिंग संपली!!

‘शुभमंगल सावधान’ची शूटिंग संपली!!

अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडनेकर यांच्या आगामी ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. आयुष्यमानने शुक्रवारी ट्विट करताना म्हटले, ‘शुटिंगचा अनुभव खूपच मजेशीर असा होता.’ त्याने लिहिले की, ‘शुभमंगल सावधान’ची शूटिंग पूर्ण झाली आहे. भूमी पेडनेकर, आर. एस. प्रसन्ना आणि आनंद एल. राय यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता.’ 



आयुष्यमानच्या ट्विटनंतर लगेचच भूमीनेदेखील म्हटले की, ‘या चित्रपटाचा अनुभव खूपच चांगला होता. आम्ही ‘शुभमंगल सावधान’ची शूटिंग पूर्ण केली आहे. धन्यवाद आयुष्यमान, आर. एस. प्रसन्ना! दुसºयांदा आयुष्यमान आणि भूमी एकत्र काम करीत आहेत. या अगोदर त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटात काम केले होते. 

‘शुभमंगल सावधान’  या चित्रपटात आयुष्यमान आणि भूमी एक विवाहित दाम्पत्य म्हणून बघावयास मिळणार आहेत. भूमी या चित्रपटाबरोबरच अक्षयकुमार स्टारर ‘शौचालय एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तर आयुष्यमान परिणितीबरोबर ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटात काम करीत आहे. आनंद ए. राय निर्मित हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

And it's a wrap of Principal Photography for #ShubhMangalSaavdhan. This is the energy, Dil se :) @aanandlrai @ayushmannk @psbhumi Godspeed! pic.twitter.com/tNpfxn66Xm

— R S Prasanna (@rs_prasanna) April 27, 2017

https://twitter.com/rs_prasanna/status/857618929979506688

‘दम लगा के हईशा’ या चित्रपटात या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोघे एकत्र येत असल्याने प्रेक्षक त्यांना कितपत पसंत करतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. आता प्रेक्षकांनाही या चित्रपटाशी संबंधित घडामोडी समोर येण्याची उत्सुकता लागली आहे.

Web Title: Shooting of Shubhamangal carefulness is over !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.